आर्थिक चणचण पाठ सोडत नाही?; मग अवश्य करा ‘हे’ उपाय
ज्योतिषशास्त्रामध्ये (astrology) तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि ग्रहांचा शुभ प्रभाव वाढवण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, आपल्या सभोवतालच्या दैनंदिन जीवनात उपयुक्त असलेल्या अनेक गोष्टींचा वापर ग्रहांना शांत करण्यास मदत करू शकतो. यापैकी दोन गोष्टी म्हणजे बार्ली आणि जव. याला हिंदू धर्मात (Hindu religion) शुभ आणि पवित्र मानले जाते. यांचा उपयोग हवन, पूजेसारख्या […]
ज्योतिषशास्त्रामध्ये (astrology) तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि ग्रहांचा शुभ प्रभाव वाढवण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, आपल्या सभोवतालच्या दैनंदिन जीवनात उपयुक्त असलेल्या अनेक गोष्टींचा वापर ग्रहांना शांत करण्यास मदत करू शकतो. यापैकी दोन गोष्टी म्हणजे बार्ली आणि जव. याला हिंदू धर्मात (Hindu religion) शुभ आणि पवित्र मानले जाते. यांचा उपयोग हवन, पूजेसारख्या अनेक शुभ कामांमध्ये देखील केला जातो. ज्योतिषशास्त्रात (astrology for money) असे काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्यामुळे जीवनात सुख-समृद्धी (prosperity) वाढते. चला तर मग जाणून घेऊया.
धन प्राप्तीसाठी
शास्त्रानुसार जव आणि बार्ली हे सोन्यासारखे शुद्ध मानले जाते. अशा परिस्थितीत गरीब आणि गरजूंना बार्ली आणि जव दान केल्याने आर्थिक चणचण दूर होऊन धनप्राप्ती होते. ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमा किंवा अमावस्येला जवाचे हवन करणे शुभ मानले जाते. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होऊन कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही सुधारते. कुंडलीत राहू ग्रहाच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात पैसा, कुटुंब, करिअर इत्यादींशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा स्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार राहूचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी शनिवारी जव, कच्चे दूध, तीळ, कोळसा, दुर्वा आणि तांबे वाहत्या पाण्यात टाकावेत. याशिवाय शनिवारी कबुतराला बार्ली खाऊ घातल्यास राहू-केतूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते असे मानले जाते.
जे लोक लाखो प्रयत्न करूनही पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्त होत नाहीत आणि जर तुम्हाला तणाव, त्रास किंवा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल तर आणखी काही उपाय आहेत त्याबद्दल जाणून घेऊया
- शिवलिंगावर रोज जल, बेलपत्र आणि अक्षत अर्पण करा.
- महालक्ष्मी आणि श्री विष्णूची पूजा करा.
- संध्याकाळी जवळच्या कोणत्याही मंदिरात दिवा लावा.
- पौर्णिमेला चंद्राची पूजा करा.
- श्रीसूक्ताचे पठण करा.
- श्री लक्ष्मी सुक्ताचे पठण करा.
- कनकधारा स्तोत्र पठण करा.
- कोणाचेही वाईट करणे टाळा.
- संपूर्ण धार्मिक आचरण ठेवा.
- घरामध्ये स्वच्छता राखा, यामुळे तुमच्या घरात कायमस्वरूपी पैसा राहील.
- आठवड्यातील कोणताही 1 उपवास करा. सोमवारी केले तर धनाचा कारक चंद्र प्रसन्न होईल. मंगळवारी केला तर बजरंगबली, बुधवारी केला तर श्री गणेश, गुरुवारी केला तर विष्णूजी, शुक्रवारी केला तर माता लक्ष्मी, शनीवारी केला तर शनिदेव, रविवारी केला तर सूर्य. प्रसन्न होऊन धन, सुख आणि सौभाग्य यांचे वरदान देईल.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)