या 3 राशीचे लोक पत्नीला कधीच ठेवत नाहीत खुश, कारण…

ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींचे पुरुष आपल्या पत्नीला समाधानी ठेवण्यात अपयशी ठरतात. मीन राशीचे पुरुष भावनिक असतानाही, त्यांचे हे गुण अनेकदा अवगुण होतात, ज्यामुळे त्यांच्या पत्नींशी वाद होतात. वृषभ राशीचे पुरुष आपले मन उघडपणे व्यक्त करू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या पत्नींना कमी कौतुक वाटते. तर तुळ राशीचे पुरुष कुटुंबाला एवढे महत्त्व देतात की त्यांना त्यांची पत्नी दुर्लक्षित होते. ही ज्योतिषशास्त्रीय माहिती असून वैज्ञानिक पुरावे नाहीत.

या 3 राशीचे लोक पत्नीला कधीच ठेवत नाहीत खुश, कारण...
लग्नानंत वर थेट तुरूंगात पोहोचला
Follow us
| Updated on: Dec 25, 2024 | 4:30 PM

लग्न हा अत्यंत पवित्र सोहळा असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात हा वेगळा क्षण येत असतो. पण लग्नानंतर नवराबायकोमध्ये प्रेम झालं नाही तर दोघेही दु:खी होतात. त्यामुळेच लग्नापूर्वी कुंडली जुळवली जाते. दोघांचा स्वभाव मॅच होईल का? लग्न दीर्घकाळपर्यंत टिकेल का? नवरा बायकोला सुखी समाधानी ठेवेल का? अशा असंख्य गोष्टी कुंडलीद्वारे जाणून घेतल्या जातात. जर दोघांचे ग्रह एकमेकांच्या उलट असतील तर लग्नानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ज्योतिष शास्त्रात काही अशा राशींची माहिती देण्यात आली आहे की, ज्या राशीचे पुरुष पत्नीला खुश करत नाहीत. ज्योतिषशास्त्र तसं सांगतं. पण याला काहीच वैज्ञानिक आधार नाही. तसा कुठलाही सर्व्हे झालेला नाही. ही केवळ ज्योतिष शास्त्रावरील आधारीत माहिती आहे. त्याला कोणताही दुजोरा देता येत नाही. तरी पण या कोणत्या राशी आहेत याचाच घेतलेला हा आढावा.

मीन राशी

या राशीच्या लोकांचा स्वभाव अत्यंत शांत असतो. या राशीचे लोक भावनिक असतात. त्यांचे हेच गुण अनेकदा अवगुणही होतात. हे लोक आपल्या लाइफ पार्टनरबाबत सेन्सिटिव्ह होतात. आपल्या लाइफ पार्टनरला ते थोड्या थोड्या गोष्टीसाठी टोकत असतात. त्यामुळेच नवरा-बायकोमध्ये नेहमी वाद होतात. घरात सतत भांडणं होतात. पार्टनरला वैयक्तिक स्वातंत्र्यच मिळत नसल्याने त्यांचाही स्वभाव चिडचिडा होतो. त्यामुळेच या राशीचे पुरुष कधीच आपल्या पत्नीला खूश ठेवत नाहीत.

वृषभ राशी

या राशीचे लोक आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यात थोडे कच्चे असतात. लग्नानंतर प्रत्येक पत्नीला आपल्या नवऱ्याकडून कौतुक ऐकणं आवडतं. पण या राशीचे लोक आपल्या मनातील गोष्ट कधीच आपल्या पत्नीला उघडपणे सांगत नाही. वृषभ राशीचे लोक शांत असतात. पण त्यांना त्यांच्या स्वभावाच्या उलट जीवनसाथी मिळाला तर दोघांमध्ये वाद होतो. त्यामुळे त्यांच्या नात्यात वाद होतात.

तुळ राशी

तुळ राशीच्या लोकांना आपल्या बायकोला खूश ठेवता येत नाही. हे लोक नकळतपणे आपल्या कुटुंबाला एवढं महत्त्व देतात की ते आपल्या बायकोला विसरून जातात. त्यांचं सोशल नेटवर्क आणि सोशल काम चांगलं असतं. असा जीवनसाथी मिळाल्याने बायको नेहमी दु:खी असते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.