AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या 5 राशींना लक्ष्मींचे वरदान! पैशांचा पाऊस पडणार, बाबा वेंगाचे भाकीत वाचलं का?

Baba Vanga Prediction Zodiac Signs : बाबा वेंगा हिने 2005 मध्ये या भाग्यवान राशींना अमाप धन, संपत्ती मिळेल, असे भाकीत केले आहे. या 5 राशींवर महालक्ष्मीची कृपा असेल. कुबेर देवता प्रसन्न होतील अशी भविष्यवाणी केली आहे. तुम्ही बाबा वेंगाचं हे भविष्य वाचलं का?

या 5 राशींना लक्ष्मींचे वरदान! पैशांचा पाऊस पडणार, बाबा वेंगाचे भाकीत वाचलं का?
बाबा वेंगाची भविष्यवाणीImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 13, 2025 | 6:04 PM
Share

तिच्या मृत्यूच्या तीन दशकानंतरही बाबा वेंगाचं गारूड अजूनही मनुष्यावर आहे. 1996 मध्ये बाबा वेंगा या बल्गेरियन गूढ भविष्यवेत्तीचा मृत्यू झाला होता. ‘बाल्कनची नास्त्रेदमस’ म्हणून ती ओळखली जाते. तिच्याकडे भविष्यातील घटना पाहण्याचे गूढ शास्त्र असल्याचा दावा करण्यात येतो. त्याआधारे तिने भविष्यातील अनेक घडामोडींची नोंद केली आहे. तिच्या गूढ काव्याचा अजूनही अनेक जण अभ्यास करतात. त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. बाबा वेंगा हिने भविष्यात जे काही पाहिले ते एका गूढ काव्यात नोंदवले आहे. तरुण वयातच तिची दृष्टी हरवली होती. पण तिने अंतर्मनाने भविष्यातील अनेक घडामोडींची नोंद केल्याचा दावा करण्यात येतो.

या राशींवर 2025 मध्ये धन वर्षा

बाबा वेंगा हिने 2025 मध्ये काही राशींविषयी भाकीत केले आहे. तिच्या मते या वर्षात या राशींवर अपार धन वर्षाव होईल. या राशी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतील. त्यांच्यावर कुबेर देवतेचा वरदहस्त असेल. या राशींना या वर्षात मोठी प्रगती साधता येईल.

1. मेष (Aries)

2025 हे वर्ष मेष राशीच्या व्यक्तींना आत्मपरीक्षण आणि वैयक्तिक विकासासाठी महत्त्वाचे असेल. मीन राशीत शनिचे भ्रमण होत आहे. या काळात तुमच्या आकांक्षा आणि महत्त्वकांक्षा यांचे पूनर्मूल्यांकन करावे लागेल. तुमचे नाते संबंध आणि करिअरमध्ये बदल होऊ शकतात, त्यामुळे संयम आणि धैर्य आवश्यक आहे. स्वत:वर विश्वास ठेवा आणि नवीन संधींचा स्वीकार करा.​ तुमच्या कंम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. जोखीम पत्करा, संधी तुमची वाट पाहत आहे.

2. वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी मिळण्याची शक्यता आहे. गुरूच्या प्रभावामुळे नवीन गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होतील. पूर्वीच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि व्यावसायिक स्थिती मजबूत होईल.​ स्वतःला कामात झोकून द्या. जोखीम घ्या. यश मिळवा.

3. मिथुन (Gemini)

इथून तिथून मिथुन, अशा या चिरतरूण राशीसाठी बाबा वेंगाने जबरदस्त भाकीत केले आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात जोमाने बदलाचा अनुभव येईल. करिअर आणि आर्थिक प्रगती साधण्याचा अनुभव येईल. नवीन कौशल्ये शिकण्याची आणि करिअरमध्ये प्रगती करण्याची संधी मिळेल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि नवीन संधींचा लाभ घ्या.​ अर्थात त्यासाठी नवीन कौशल्य आत्मसात करण्याची तयारी ठेवा, बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा. येणारा सुवर्ण भविष्यकाळ तुमचाच आहे.

4. सिंह (Leo)

सिंह राशीच्या व्यक्तींना नातेसंबंधांमध्ये बदल आणि वैयक्तिक जीवनात नवीन सुरुवात दिसेल. या काळात वैयक्तिक नातेसंबंधात दृढता दिसेल आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे लक्ष्य गाठता येईल. वैयक्तिक विकासासाठी हा काळ अनुकूल आहे. नवीन नात्यांमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळेल.​ वैयक्तिक आणि व्यावसायिक आघाडीवर मोठी झेप घेता येईल.

5. कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या व्यक्तींना घरगुती आणि कौटुंबिक जीवनात मोठे बदल जाणवतील. नवीन जबाबदार्‍या आणि कुटुंबातील संबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे.​ तुमची लपलेली कौशल्य, शक्तीस्थानं तुम्हाला गवसतील. तुमच्या एक अभूतपूर्व उत्साह असेल. नाविन्यपूर्ण कल्पनांवर काम करण्यास घाबरू नका. या काळात एक शक्ती तुमच्या पाठीशी असल्याचे तुम्हाला जाणवेल. त्या बळावर तुम्ही मोठी झेप घेऊ शकाल. ही माहिती Times of India च्या लेखावर आधारित आहे.

डिस्क्लेमर : बाबा वांगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.

कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या...
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या....
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?.
'या' महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार? बघा तुमची महापालिका आहे का?
'या' महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार? बघा तुमची महापालिका आहे का?.
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.