Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bedroom Vastu Ruels : शांत झोप हवी असेल तर चुकूनही दुर्लक्ष करु नका ‘या’ वास्तू नियमांकडे

शयनकक्ष हा कोणत्याही घरातील एक असा कोपरा असतो, जिथे गेल्यावर प्रत्येक माणसाला जगातील सर्व दुःख, चिंता सोडून चांगली झोप घ्यायची असते, जर तुमचीही हीच इच्छा असेल तर चांगली झोप घेण्यासाठी तुमच्या बेडरूमला वास्तुनुसार रंगकाम करा.

Bedroom Vastu Ruels : शांत झोप हवी असेल तर चुकूनही दुर्लक्ष करु नका 'या' वास्तू नियमांकडे
शांत झोप हवी असेल तर चुकूनही दुर्लक्ष करु नका या वास्तू नियमांकडे
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 4:30 PM

मुंबई : दिवसभराच्या धकाधकीनंतर प्रत्येक व्यक्तीला वाटते की, रात्री बेडवर पडल्यावर शांत झोप लागावी. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक सहसा आपली बेडरूम चांगली बनवण्याचा प्रयत्न करतात, पण तुम्हाला माहित आहे का की शांत झोपेसाठी फक्त चांगला बेडच नाही तर वास्तुनुसार तुमची बेडरूम देखील खूप महत्त्वाची आहे. जर तुमच्या बेडरूममध्ये वास्तुदोष असेल तर त्यातून निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा तुमच्या शांत झोपेवरच नाही तर वैवाहिक जीवनावरही परिणाम करते.

वास्तुनुसार रंगकाम करा

शयनकक्ष हा कोणत्याही घरातील एक असा कोपरा असतो, जिथे गेल्यावर प्रत्येक माणसाला जगातील सर्व दुःख, चिंता सोडून चांगली झोप घ्यायची असते, जर तुमचीही हीच इच्छा असेल तर चांगली झोप घेण्यासाठी तुमच्या बेडरूमला वास्तुनुसार रंगकाम करा. वास्तूनुसार बेडरूममध्ये गुलाबी, हलका निळा किंवा हलका हिरवा रंग असावा. यामुळे तुम्हाला चांगली झोप तर मिळेलच पण तुमचे वैवाहिक जीवनही मधुर राहील.

बेडरुम आणि बेड कुठे असावे

लाख इच्छा करूनही योग्य वेळी झोप येत नसेल किंवा वारंवार झोपमोड होत असेल, तर तुम्ही तुमच्या बेडरूमच्या आणि बेडच्या दिशेकडे लक्ष द्या. वास्तूनुसार तुमच्या बेडरूमची ईशान्य दिशा नेहमी रिकामी असावी आणि तुमचा पलंग नेहमी दक्षिण-पश्चिम दिशेला असावा. जर आपण आपल्या पलंगाच्या डोक्याबद्दल बोललो तर ते नेहमी दक्षिणेकडे ठेवण्याचा प्रयत्न करा.

शांत झोपेसाठी हे उपाय देखील करा

जर तुमची झोप वेळोवेळी भंग होत असेल तर तुम्ही तुमच्या खोलीत फ्रीज किंवा नॉईज कुलर इत्यादी ठेवणे टाळावे. बेडरूममध्ये टीव्ही नसावा यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत, कारण जेव्हा बेडरूममध्ये टीव्ही असतो तेव्हा लोक रात्री उशिरापर्यंत पाहत बसतात, त्यामुळे झोप पूर्ण होत नाही. त्याचबरोबर बेडरूममध्ये आरशाचा वापर टाळावा. हा आरसा लावण्याची सक्ती असेल तर तो कापडाने झाकून ठेवावा. (Bedroom Vastu Ruels, dont ignore this rules for your good sleep)

इतर बातम्या

chanakya Niti | आयुष्यात 5 गोष्टीपासून सावध राहा, नाहीतर भोगावे लागतील वाईट परिणाम

Door Vastu Tips : दाराशी संबंधित वास्तुदोषामुळे येते दुर्भाग्य, दूर करण्यासाठी करा हे उपाय

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.