Chaitra Navratri 2023 : नवरात्रीच्या दिवसात केलेल्या या उपायांचे मिळतात अत्यंत शुभ फळ

नवरात्रीच्या नऊ दिवसांत काही ठिकाणी देवीची जत्राही भरते. याशिवाय मराठी नव वर्षाची सुरूवात गुढी पाडवा देखील या दिवशी साजरा होतो.

Chaitra Navratri 2023 : नवरात्रीच्या दिवसात केलेल्या या उपायांचे मिळतात अत्यंत शुभ फळ
नवरात्रीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 1:39 PM

मुंबई : नवरात्रीची सुरुवात 22 मार्च, बुधवारपासून होईल आणि 30 मार्च, गुरुवारी समाप्त होईल. नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या (Chaitra Navratri 2023) पहिल्या दिवशी कलशाची स्थापना करून दुर्गा मातेची पूजा केली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत काही ठिकाणी देवीची जत्राही भरते. याशिवाय मराठी नव वर्षाची सुरूवात गुढी पाडवा (Gudi Padwa 2023) देखील या दिवशी साजरा होतो. नवरात्रीच्या अष्टमी व नवमीला लहान मुलींना माता दुर्गेचे रूप मानून कन्याभोजाचे आयोजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. त्याचबरोबर नवरात्रीच्या काळात वास्तूची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे मानले जाते. चला जाणून घेऊया वास्तूनुसार देवीची मूर्ती आणि कलश कसे तयार करावे.

1. मूर्तीची स्थापना

नवरात्रीच्या काळात देवीची मूर्ती किंवा कलश नेहमी ईशान्य दिशेला लावावा. या दिशेला देवतांचा वास असतो. तसेच यामुळे  सकारात्मक ऊर्जा प्रवाहीत राहते. अखंड ज्योतीची स्थापना आग्नेय कोनातच करावी.

2. मुख्य द्वार

नवरात्रीच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह लावावे, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. यासोबतच घराचा मुख्य दरवाजा आंब्याच्या पानांनी सजवावा. यामुळे घर सुंदर दिसते आणि घरात शुभता राहते.

हे सुद्धा वाचा

3. चौरंग

लाकडी चौरंगावर चंदनाचा पाट ठेवावा व त्यावर देवीची मूर्ती स्थापण करावी. वास्तुशास्त्रात चंदनाला शुभ आणि सकारात्मक ऊर्जेचे केंद्र मानले जाते. यामुळे वास्तुदोष संपतात.

4. काळा रंग

असे मानले जाते की कोणत्याही शुभ मुहूर्तावर काळ्या रंगाचा वापर करू नये. नवरात्रीच्या पूजेतही काळ्या रंगाचा वापर करू नये.  काळा रंग घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो . काळ्या रंगाने मन सतत विचलित होते.

5. या रंगांचा करा वापरा

नवरात्रीत पिवळा आणि लाल रंग वापरावा. असे मानले जाते की पिवळा रंग जीवनात उत्साह, तेज आणि आनंद आणतो आणि लाल रंग जीवनात उत्साह आणतो. आईलाही या रंगांनी सजवावे. वास्तूनुसार या रंगांच्या वापराने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते.

6. कापूर आरती

नवरात्रीच्या संध्याकाळनंतर कापूर जाळून मातेची आरती करावी. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते.

7. लिंबाचे सेवन टाळा

नवरात्रीच्या काळात लिंबाचा वापर टाळावा. नवरात्रीमध्ये घरातील आंबट वस्तूंचा वापर कमी करावा. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि मनही अशांत राहते.

8. शेणाचा वापर

नवरात्रीमध्ये घराचे अंगण शेणाने सारवावे. हे शक्य नसेल तर घराच्या अंगणात  7 मातीची भांडी लटकवावीत. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि देवी लक्ष्मी घरात वास करेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....