Chanakya Niti | विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचं असेल तर आचार्य चाणक्य यांचे ‘हे’ 7 मंत्र नेहमी लक्षात ठेवा…
प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते, की त्यांची मुलं योग्य बनावी (Chanakya Niti) आणि एक प्रतिभावान आणि योग्य मुले फक्त स्वत:चच भविष्य उज्ज्वल करत नाही तर आपल्या आई-वडिलांची मान अभिमानाने उंचावतात.
मुंबई : प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते, की त्यांची मुलं योग्य बनावी (Chanakya Niti) आणि एक प्रतिभावान आणि योग्य मुले फक्त स्वत:चच भविष्य उज्ज्वल करत नाही तर आपल्या आई-वडिलांची मान अभिमानाने उंचावतात. पण, मुलांना गुणवान आणि योग्य बनवण्यासाठी चांगले संस्कारांसोबतच त्यांना चांगली शिक्षा मिळणेही गरजेचे आहे. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये मुलांना चांगलं भविष्य देण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यापासून विद्यार्थ्यांनी नेहमी दूर राहायला हवं (Chanakya Niti Seven Mantra Of Acharya Chanakya For Students).
त्या गोष्टी काय?
राग: राग हा कोणत्याही व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू असतो कारण यामुळे संतापलेल्या व्यक्तीचे सर्वाधिक नुकसान होते. रागाच्या भरात कोणतीही व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही. कारण, त्यावेळी तो कोणतीही परिस्थिती पूर्णपणे पाहण्यात सक्षम नसतो. म्हणून नेहमी रागापासून दूर राहावं.
कामवासना : ज्या विद्यार्थ्यांना त्यांचं भविष्य खरंच उज्ज्वल बनवायचं असेल त्यांनी कामवासना आणि काम क्रियेपोसून दूर राहावं. यामुळे मन भरकटत राहाते. असे विद्यार्थी कधीही पूर्ण मनानेआणि प्रामाणिकपणे शिक्षा ग्रहण करु शकत नाही.
संतुलित आहार : विद्यार्थ्यांनी नेहमीच सात्विक आणि हलके जेवण करायला हवे. त्यांनी जेवणाच्या चवदारपणाकडे फारसं लक्ष देऊ नये. तर एखाद्या तपस्वी सारखा आहार घ्यावा. संतुलित आहार घेतल्यास विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले असेल आणि त्यांच्या शिक्षणामध्ये कोणताही अडथळा येणार नाही.
श्रृंगार : अभ्यास करणार्या मुलांनी नेहमीच श्रृंगारापासून दूर राहावे. एकदा जर ते यात पडले तर विद्यार्थ्यांचे मन अनेकदा फॅशनच्या भोवती फिरत असते. अशा परिस्थितीत मन अभ्यासात लागत नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांनी नेहमी साधे जीवन जगले पाहिजे.
करमणूक : करमणूक आणि खेळ महत्त्वाचे आहेत, पण ते मर्यादित असले पाहिजे. जास्त मनोरंजन किंवा खेळ विवंचनेचे कारण बनतात.
लोभ : लोभ ही एक वाईट गोष्ट असल्याचे म्हटले जाते. हे केवळ विद्यार्थी जीवनावरच नव्हे तर प्रत्येकाच्या जीवनात देखील लागू होते. लोभी व्यक्ती कधीही स्वत: मेहनत करुन काही मिळवत नाही. तो नेहमी फसवणूक इतरांच्या गोष्टी मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. म्हणून, लोभ कधीही करु नये.
झोप : चांगल्या शिक्षणासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. विद्यार्थी जीवनात, कोणत्याही विद्यार्थ्याने 6-7 तास झोप घेतली पाहिजे. जास्त झोपेमुळे त्याचे शिक्षणात विघ्न पडू शकते.
Chanakya Niti | जर ध्येय गाठायचं असेल तर आचार्य चाणक्य यांचे हे सल्ले नेहमी लक्षात ठेवा…https://t.co/p3juL0LlnI#ChanakyaNiti #AcharyaChanakya
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 1, 2021
Chanakya Niti Seven Mantra Of Acharya Chanakya For Students
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Chanakya Niti | तुमच्या यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे ‘हा’ दोष, लवकरात लवकर सोडा अन्यथा नुकसान होणार
Chanakya Niti : संपत्तीबाबत आचार्य चाणक्य यांचे ‘हे’ सल्ले नक्की वाचा…