Chanakya Niti : आर्य चाणक्य म्हणतात पत्नीत जर हे तीन गुण असतील तर त्या घरात पैशांची कधीच कमी नसते
आर्य चाणक्य हे एक थोर राजनितीतज्ज्ञ, कुटनितीतज्ज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहीला. या ग्रथांमध्ये चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

आर्य चाणक्य हे एक थोर राजनितीतज्ज्ञ, कुटनितीतज्ज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहीला. या ग्रथांमध्ये चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही व्यक्तीला आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य नीती या आपल्या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी विविध विषयांवर चर्चा केली आहे, ज्यामध्ये आदर्श पत्नी कशी असावी? आदर्श पत्नीची लक्षण काय आहेत. पती कसा असावा, आदर्श पती कोणाला म्हणावे? आदर्श गुरू कसा असावा. आयुष्य जगत असताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत. कोणत्या गोष्टी या समजाला सांगाव्यात आणि कोणत्या गोष्टी गुप्त ठेवाव्यात अशा एकना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. दरम्यान चाणक्य यांनी पत्नीचे असे तीन गुण सांगितले आहेत, हे जर तुमच्या पत्नीमध्ये असतील तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैशांची कमतरता कधीच भासणार नाही असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. जाणून घेऊयात या गुणांबद्दल
आर्य चाणक्य म्हणातत तुमची पत्नी शिकलेली असावी, जर तुमची पत्नी शिकलेली असेल, तिला व्यवाहार ज्ञान असेल तर तुम्हाला तिची मोलाची मदत होते. तुमचा जीथे अनावश्यक ठिकाणी पैसा खर्च होतो तीथे तो होत नाही. आयुष्यासाठी बचत शिल्लक राहाते. तुमची व्यवहारामध्ये कोणीही फसवणूक करू शकत नाही.
आर्य चाणक्य म्हणतात तुमची पत्नी सुशिक्षित तर असावीच पण सोबत धार्मिक देखील असावी. तुमची पत्नी जर धार्मिक असेल तर ती तुमच्या मुलांवर योग्य ते संस्कार करू शकते. मुलांना योग्य दिशा देऊ शकते. घरामध्ये धार्मिक आणि प्रसन्न वातावरण राहातं. अशा घरात लक्ष्मी मातेची कृपा राहाते.
पत्नी काटकसर करणारी असावी असंही आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे. पत्नीने कधी पैशांची उधळपट्टी करू नये. पैशांची बचत करावी, ज्यामुळे भविष्यात येणाऱ्या संकटांचा तुम्ही सहज सामना करू शकता. पैशांची बतच होते, असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.