Chanakya Niti | माणसं ओळखायला चुकताय? नेहमीच फसवणूक होतेय? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा
आचार्य चाणक्य यांनी आयुष्यातील प्रत्येक पैलूवर आपले विचार मांडले आहेत. त्यांच्या नीतिशास्त्रा या रचनेत त्यांनी ही माहिती दिली आहे. याच रचनेत त्यांनी माणसे कशी ओळखावी यासाठी काही चाचण्या सांगितल्या आहेत.
मुंबई : आचार्य चाणक्य यांनी आयुष्यातील प्रत्येक पैलूवर आपले विचार मांडले आहेत. त्यांच्या नीतिशास्त्रा या रचनेत त्यांनी ही माहिती दिली आहे. याच रचनेत त्यांनी माणसे कशी ओळखावी यासाठी काही चाचण्या सांगितल्या आहेत. आपल्या आयुष्यात अनेक जण येतात पण त्यातील काही जण आपल्याला भावतात. पण आचार्य चाणक्य यांच्या मते जीवनात आलेली लोक आपल्याला योग्य ती दिक्षा दाखवतात. पण आपली संगत चुकली तर आपण आधोगतीच्या मार्गाकडे वळतो.आचार्य यांनी व्यक्तीची चाचणी घेण्यासाठी काही मापदंड दिले आहेत. जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेऊन मैत्री केली तर तुम्ही आयुष्यात कोणीही फसवू शकणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी. चाणक्य नीतीच्या पाचव्या अध्यायात एक श्लोक आहे. या श्लोकात आचार्यांनी कोणत्याही व्यक्तीची परीक्षा घेण्यासाठी ४ पद्धती सांगितल्या आहेत.
चाणक्य नीतीमधील श्लोक
‘यथ चतुर्भिः कनकम परिक्ष्यते निदर्शनम् छेदंततपतदानैः आणि चतुर्भिः पुरुष्यम् परिक्ष्यते त्यागेन शीलें गुणेन कर्मणा’.
?व्यक्तीचा त्याग
एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तो व्यक्ती किती त्याग करु शकतो ही गोष्ट लक्षात घ्या.एखादी व्यक्ती इतरांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी आपल्या आनंदाचा त्याग करू शकते, तर अशा व्यक्तीला तुमच्या आयुष्यात कधीही अंतर देवू नका. अशा व्यक्तींकडे इतरांना समजून घेण्याची क्षमता असते.
?चारित्र्य म्हणजे दागिना चारित्र्य म्हणजे माणसाचा दागिना समजला जातो. ज्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले नाही,त्याच्यावर तुम्ही थोडा देखील विश्वास ठेवू शकत नाही. कारण या प्रकारच्या व्यक्ती तुमचा कधीही घात करू शकतात.
? गुण महत्त्वाचे
गुण आणि अवगुणामुळे आपण माणसाला ओळखू शकतो. ज्या लोकांना रागीट, गर्विष्ठ किंवा खोटे बोलण्याची सवय असते, अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवू नये. हे लोक कधीही तुम्हाला संकटात पाडू शकतात.
? कर्म धर्माच्या मार्गाने, इतरांना मदत करून पैसा कमावणाऱ्यांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. परंतु जे लोक स्वार्थी, स्वतःच्या फायद्याचा विचार करतात आणि चुकीच्या मार्गाने पैसा कमावतात, त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये.
(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.)
इतर बातम्या
चमत्कारिक तुळशीचे पाणी, नोकरी-व्यवसायात प्रगती, आजारातून मुक्त होण्यास होईल मदत