आज होणार देवीच्या ‘कुष्मांडा’ अवताराचा जागर, जाणून घ्या पूजेची वेळ आणि सर्व काही एका क्लिकवर
सध्या सर्वकडे चैत्र नवरात्री (Chaitra Navratra) साजरी केली जातं आहे. आज नवरात्रीमध्ये देवीच्या चौथ्या रूपाची पूजा केली जाणार आहे. देवी कुष्मांडा (Krushmanda) हे आदिशक्तीचे चौथे रूप आहे.
मुंबई : सध्या सर्वकडे चैत्र नवरात्री (Chaitra Navratra) साजरी केली जातं आहे. आज नवरात्रीमध्ये देवीच्या चौथ्या रूपाची पूजा केली जाणार आहे. देवी कुष्मांडा (Krushmanda) हे आदिशक्तीचे चौथे रूप आहे. विश्वाच्या निर्मितीपूर्वी जेव्हा चहूबाजूंनी अंधार होता आणि सृष्टी पूर्णपणे शून्य होती, तेव्हा आदिशक्ती दुर्गानी या विश्वाची निर्मिती केली. म्हणूनच देवीच्या चौथ्या रूपाला कुष्मांडा असे म्हटले गेले. अशी माहिती भागवत पुराणात (Bhagwat Purn) मिळते. कुष्मांडा देवी या विश्वाची निर्माती असल्यामुळे तिला आदिशक्ती या नावाने देखील ओळखले जाते. या देवीच्या उपासनेने माणसाला शक्ती आणि आरोग्य प्राप्त होते, असेही मानले जाते. आज देवीच्या पूजेत मिठाई विशेष अर्पण करावी.
देवीचे वर्णन
कुष्मांडा हिला आठ भुजां असल्यामुळे तिला आठ भुजाही म्हणतात. त्यांच्या सात हातात अनुक्रमे कमंडल धनुष्य बाण, कमळ, कलश आणि अमृताने भरलेली गदा दिसते, तर आठव्या हातात जपमाळ आहे.
अशी पुजा करा
दुर्गापूजेच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची मनोभावे पूजा करावी. सर्व प्रथम पहिल्या दिवशी कलशात बसलेल्या देवतांची पूजा करा. त्यानंतर कुष्मांडाची पुजा करावी. हातात फुले घेऊन मातेची पूजा करून देवीच्या मंत्राचे ध्यान करावे.
पुजेचे महत्त्व
कुष्मांडा मातेच्या उपासनेचे खूप महत्त्व आहे. देवी कुष्मांडा देवी रोग आणि दुःख दूर करून आरोग्याचा आशीर्वाद देते.मातेच्या पुजेने जीवन मिळते.वैवाहिक , कीर्ती आणि सामर्थ्य मिळते अशी मान्यता आहे. देवी कुष्मांडा मातेच्या उपासनेने सर्व प्रकारचे संकट दूर होतात असे विधान आपल्या पुराणांमध्ये आहे.
(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा)
संबंधीत बातम्या
Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!
Zodiac | आजचा रविवार ‘या’ 4 राशींसाठी अत्यंत शुभ, धनलाभ होण्याचा योग!