मुलांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित होत नाही? वास्तूशास्त्राचे ‘हे’ उपाय ठरतील फायदेशीर

विध्यार्थी दशेत बऱ्याच मुलांचे मन चंचल (Flickering) असते. याउलट काही इतके स्थिर आणि एकाग्र (concentration) असतात की, ते सतत अभ्यासात (study) मग्न असतात. चंचल मुलांना शिक्षणाच्या आणि अभ्यासाच्या नावाचासुद्धा तिटकारा असतो. त्याचे लक्ष अभ्यासात कधीच नसते. दुर्दैवाने कोरोना महामारीनंतर मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव आणखी वाढला आहे.  परंतु काही वास्तु आणि ज्योतिषीय उपायांद्वारे (Astrology remedy) ते त्यांचे […]

मुलांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित होत नाही? वास्तूशास्त्राचे 'हे' उपाय ठरतील फायदेशीर
BITS Pilani Bsc
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 9:56 AM

विध्यार्थी दशेत बऱ्याच मुलांचे मन चंचल (Flickering) असते. याउलट काही इतके स्थिर आणि एकाग्र (concentration) असतात की, ते सतत अभ्यासात (study) मग्न असतात. चंचल मुलांना शिक्षणाच्या आणि अभ्यासाच्या नावाचासुद्धा तिटकारा असतो. त्याचे लक्ष अभ्यासात कधीच नसते. दुर्दैवाने कोरोना महामारीनंतर मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव आणखी वाढला आहे.  परंतु काही वास्तु आणि ज्योतिषीय उपायांद्वारे (Astrology remedy) ते त्यांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित करता येणे शक्य आहे. त्यातील एक उपाय म्हणजे मुलांच्या खोलीत मेणबत्त्या लावणे. चला जाणून घेऊया मुलांच्या खोलीत मेणबत्त्या कोणत्या दिशेला ठेवाव्यात जेणेकरून त्यांचे मन अभ्यासात गुंतून राहील. यासोबतच मुलांचे अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी इतर ज्योतिषीय उपाय जाणून घेऊया.

कोणत्या दिशेला लावावी मेणबत्ती

मुलांच्या खोलीच्या पूर्व, उत्तर-पूर्व किंवा दक्षिण भागात मेणबत्ती लावल्याने अभ्यासाबद्दल मुलांचं आकर्षण वाढतं, त्यांना अभ्यासात रस निर्माण होते. याशिवाय त्यांची बौद्धिक क्षमता देखील वाढते.

हे सुद्धा वाचा

कोणत्या दिशेला लावू नये मेणबत्ती

आपण जाणून घेतले की, मेणबत्ती लावण्याची योग्य  दिशा किंवा ठिकाण कुठले आहे, पण काही ठिकाणे अशी आहेत जिथे मेणबत्ती चुकूनही लावू नये. उदाहरणार्थ, घराच्या उत्तर दिशेला मेणबत्ती लावल्याने पैसा कमविण्याच्या अडथळा येतो आणि घराच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो. त्यामुळे घराच्या उत्तर कोपऱ्यात मेणबत्ती लावू नये. याशिवाय घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला मेणबत्ती ठेवू नये. येथे मेणबत्ती लावल्याने सदस्यांमध्ये अशांतता निर्माण होते आणि मनात घरातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण होतो.

अभ्यासाचे टेबल आणि खुर्चीचा आकार

स्टडी टेबलचा आकार आयताकृती असावा. चौकोनी किंवा आयताकृती आकार काही लोकांना आकर्षक वाटू शकतो परंतु यामुळे अभ्यासात एकाग्रता कमी होते. शक्य असल्यास, टेबल अशा प्रकारे ठेवा की मुलाच्या तोंडासमोर भिंत येणार नाही. खुर्चीचा मागचा भागही मजबूत असल्याची खात्री करा.

एकाग्रता वाढवण्यासाठी जोतिष्यशास्त्रातले उपाय

  1. ज्योतिष शास्त्रानुसार भगवान विष्णूच्या चित्रासमोर तुपाचा दिवा लावणे, केळीच्या झाडाला जल अर्पण करणे आणि झाडाच्या मातीचा टिळा  लावणे देखील लाभदायक मानले जाते.
  2. ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुमच्या मुलाला अभ्यासात अजिबात रुची नसेल तर तुम्ही त्याच्या खिशात तुरटीचा एक छोटा तुकडा ठेवावा आणि दररोज आपल्या मुलाच्या कपाळावर आणि नाभीला कुंवाचा टिळा लावावा.
  3. मुलांची अभ्यासात रुची वाढवण्यासाठी प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णूच्या मंदिरात आपल्या कुवतीनुसार धार्मिक पुस्तके आणि पेन दान करणे देखील शुभ मानले जाते.
  4. अभ्यासाचे टेबल नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून असावे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.