कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी महाशिवरात्रीला करा ‘हे’ खास उपाय!
कुंडलीमध्ये (Kundali) कालसर्प असेल तर जीवनात सर्व संकटे येतात असे म्हटंले जाते. राहू आणि केतू मिळून काल सर्प दोष (Rahu-Ketu) निर्माण करतात. जेव्हा सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये येतात तेव्हा कालसर्प दोष तयार होतो. कालसर्प दोष घरातील शुभ कार्यात व्यत्यय आणतो.
मुंबई : कुंडलीमध्ये (Kundali) कालसर्प असेल तर जीवनात सर्व संकटे येतात असे म्हटंले जाते. राहू आणि केतू मिळून काल सर्प दोष (Rahu-Ketu) निर्माण करतात. जेव्हा सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये येतात तेव्हा कालसर्प दोष तयार होतो. कालसर्प दोष घरातील शुभ कार्यात व्यत्यय आणतो, संततीप्राप्ती आणि प्रगतीमध्ये अडथळे (Obstacles) निर्माण करतो. तणावाचे वातावरण निर्माण होते. जर तुम्हालाही यामुळे सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल, तर महा शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही त्याचे निवारण करण्यासाठी उपाय करावेत. कालसर्प दोष कसा दूर करायचा ते येथे जाणून घ्या.
- 1 महाशिवरात्रीच्या दिवशी कालसर्प दोष दूर करण्यासाठी शिवलिंगावर तांब्याचा मोठा नाग बनवून अर्पण करावा. ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा जप करा. यासोबतच नाग आणि नागाची चांदीची जोडी पाण्यात ठेवावी.
- 2 या दिवशी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर चांदीचे नाग आणि नागाची जोडी अर्पण करावी आणि लाल लोकरीच्या आसनावर बसून रुद्राक्षाच्या माळा घालून नाग गायत्री मंत्राचा जप करावा. यानंतर कालसर्प दोष दूर करण्यासाठी शिव आणि माता पार्वतीची प्रार्थना करा.
- 3 महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक केल्याने सर्व समस्या दूर होतात. तुम्ही ज्योतिषाच्या देखरेखीखाली रुद्राभिषेक करावा आणि कालसर्प दोषापासून मुक्तीसाठी परमेश्वराला प्रार्थना करावी.
- 4 कालसर्प दोष टाळण्यासाठी गणपती आणि माता सरस्वतीची उपासनाही खूप फलदायी आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी गणपती आणि माता सरस्वतीची विशेष पूजा करावी. गणपती केतूच्या वेदना शांत करतो आणि देवी सरस्वती राहूचा प्रभाव दूर करते.
संबंधित बातम्या :
शनिवारी पिंपळाची पूजा केल्याने शनिदेव का प्रसन्न होतात, जाणून घ्या कथा!