श्रावण सोमवार निमित्ताने अमरावतीच्या पुरातन कोंडेश्वर मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा…
कोंडेश्वर मंदिरात सकाळी 7 वाजेपर्यंत अभिषेक चालला. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. कोरोणाच्या दोन वर्षानंतर आता निर्बंध मुक्त झाल्याने सकाळपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी कोंडेश्वर येथे गर्दी केली केलीयं.
अमरावती : नुकताच श्रावण महिन्याला सुरूवात झालीयं. त्यातच आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार (Monday)असल्याने राज्यभरातील शिवमंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी (Crowd) होत आहे. अमरावतीपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेले पुरातन कोंडेश्वर (Kondeshwar) येथील शिव मंदिरात देखील श्रावण सोमवार निमित्त्याने सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली झालीयं. रात्रीपासून या मंदिरात शिवपिंडीच्या अभिषेकाला प्रारंभ झाला होता. त्यानंतर सकाळी पहाटेपासून भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा बघायला मिळतायं. आज दिवसभर भाविकांची गर्दी अजून वाढण्याची देखील शक्यता आहे. कोंडेश्वर मंदिर हे एक पुरातन मंदिर असल्याने श्रावण सोमवारी भाविक लांबवरून दर्शनासाठी येतात.
कोंडेश्वर मंदिरात शिवपिंडीच्या अभिषेकाला प्रारंभ
कोंडेश्वर मंदिरात सकाळी 7 वाजेपर्यंत अभिषेक चालला. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. कोरोणाच्या दोन वर्षानंतर आता निर्बंध मुक्त झाल्याने सकाळपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी कोंडेश्वर येथे गर्दी केली केलीयं. अकोल्यात श्रावण मासानिमित्त तीज उत्सव राणीसती धाम येथे साजरा करण्यात येत असून या उत्सवात महिलांनी येथील परिसरातील झोपाळ्यावर सावन के झुले चा मनमुराद आनंद घेतला आहे.
श्रावण मासानिमित्त तीज उत्सव राणीसती धाम येथे साजरा
या उत्सवात महिलांसोबतच नवीन लग्न झालेल्या मुली आवर्जून सहभाग घेतात. गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात येतो. पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त राज्यभरातील मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शहरातील सामाजिक संस्थांकडून फराळ वाटपाचे देखील आयोजन केले आहे. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात देखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीयं.