Diwali 2021 | देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचं असले तर दिवाळीच्या रात्री इंद्राने रचलेल्या महालक्ष्मी स्तोत्राचं पठण करा
दिवाळीचा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. यावेळी दिवाळी गुरुवार 4 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी रिद्धी-सिद्धी देणाऱ्या गणेशाची आणि संपत्तीची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. श्रीगणेशाला बुद्धी देणारा मानले जाते आणि देवी लक्ष्मी ही सुख, शांती आणि समृद्धी देणारी मानली जाते.
मुंबई : दिवाळीचा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. यावेळी दिवाळी गुरुवार 4 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी रिद्धी-सिद्धी देणाऱ्या गणेशाची आणि संपत्तीची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. श्रीगणेशाला बुद्धी देणारा मानले जाते आणि देवी लक्ष्मी ही सुख, शांती आणि समृद्धी देणारी मानली जाते.
जर तुम्हाला तुमच्या जीवनात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर श्रीगणेशाला सद्बुद्धी मिळावी म्हणून प्रार्थना करा, तरच लक्ष्मी तुमच्यासोबत राहू शकते. यामुळेच दिवाळीच्या दिवशी गणेश आणि लक्ष्मी या दोघांचीही एकत्र पूजा केली जाते. ज्योतिषी डॉ. अरविंद मिश्रा यांच्या मते, दिवाळीची रात्र ही महालक्ष्मीच्या विशेष उपासनेची रात्र आहे. ही रात्र व्यर्थ झोपून वाया घालवू नये.
दिवाळीच्या संध्याकाळी विधीवत गणेशाची आणि देवी लक्ष्मीची पूजा करा. गणपतीला सद्बुद्धी देण्याची प्रार्थना करा. त्या दोघांसमोर रात्रभर अखंड दिवा लावा. यानंतर रात्री जागरण करुन देवी लक्ष्मीच्या विशेष मंत्रांचा जप करावा. या रात्री देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते, अशी मान्यता आहे.
आज आम्ही तुम्हाला देवराज इंद्राने रचलेले ‘महालक्ष्मी कृपा प्रार्थना स्तोत्र’ सांगणार आहोत, ज्याचे वाचन करुन तुम्ही सहजपणे देवीचा आशीर्वाद मिळवू शकाल. यासोबतच असे काही सिद्ध मंत्र देखील आहेत ज्यांच्या जपाने महालक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि तिच्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते.
इंद्र रचित महालक्ष्मी कृपा प्रार्थना स्तोत्र
इन्द्र उवाच
नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते
नमस्ते गरुड़ारूढ़े कोलासुरभयंकरि सर्वपापहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तुते
सर्वज्ञे सर्ववरदे देवी सर्वदुष्टभयंकरि सर्वदु:खहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तुते
सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि मन्त्रपूते सदा देवि महालक्ष्मी नमोऽस्तुते
आद्यन्तरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि योगजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तुते
स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे महापापहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तुते
पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणी परमेशि जगन्मातर्महालक्ष्मी नमोऽस्तुते
श्वेताम्बरधरे देवि नानालंकारभूषिते जगत्स्थिते जगन्मातर्महालक्ष्मी नमोऽस्तुते
महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं य: पठेद्भक्तिमान्नर: सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा
एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम् द्विकालं य: पठेन्नित्यं धन्यधान्यसमन्वित:
त्रिकालं य: पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम् महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा.
महालक्ष्मी सिद्ध मंत्र
1. समृद्धीसाठी : पद्मानने पद्म पद्माक्ष्मी पद्म संभवे तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम्
2. धन प्राप्तीसाठी : ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मी नम:
3. अडथळे दूर करण्यासाठी : ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नम:
4. कर्जातून मुक्तीसाठी : ॐ ह्रीं श्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूरये, धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा:
5. यशप्राप्तीसाठी : ॐ ह्रीं त्रिं हुं फट
हे देखील लक्षात ठेवा
तुम्ही या मंत्रांचा किमान 108 वेळा आणि जास्तीत जास्त 5, 7, 11, 51, 101 जपमाळ तुमच्या श्रद्धेनुसार पाठ करु शकता. कमळाचे गट्टे किंवा स्फटिकाच्या माळेने त्याचा जप करा.
Narak Chaudas 2021 : नरक चतुर्थीच्या दिवशी ‘ही’ तीन कामे करण्यास चुकूनही विसरु नकाhttps://t.co/IkzpwmHHWq#Diwali2021 |#NarakChaturthi |#ThreeThings |#Remember
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 2, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Narak Chaturdashi 2021 : नरक चतुर्दशीच्या दिवशी ‘अशी’ करा पूजा, जीवनातील सर्व सुख होतील प्राप्त
Diwali 2021 : घराच्या मुख्य दारावर या तीन गोष्टी लावा, घरात लक्ष्मी नांदेल