Diwali 2021 | आज वसुबारस, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि मुहूर्त
'वसुबारस; हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. दिवाळीचा सण वसुबारसपासून सुरु होतो. हा सण साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शेती संपत्तीचा आधार असलेल्या गायींचा सन्मान करणे. विवाहित महिला आपल्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी या दिवशी श्री कृष्णासोबतच गायीची पूजा करतात.
मुंबई : ‘वसुबारस; हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. दिवाळीचा सण वसुबारसपासून सुरु होतो. हा सण साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शेती संपत्तीचा आधार असलेल्या गायींचा सन्मान करणे. विवाहित महिला आपल्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी या दिवशी श्री कृष्णासोबतच गायीची पूजा करतात.
वसुबारसचे महत्त्व काय?
वसुबारसला बछ बारसचे पर्व असेही म्हटले जाते. हे पर्व नंदिनी व्रत म्हणूनही साजरे केले जाते. कारण नंदिनी आणि नंदी (बैल) हे दोन्ही शैव धर्मात अत्यंत पवित्र मानले जातात. मुळात मानवांनी गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात. त्यामुळे या दिवशी गाय आणि वासरु यांची एकत्रित पूजा केली जाते.
जाणून घ्या वसुबारसच्या व्रताबाबत
या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी उपवास करतात. यादिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ, गायीचे दूध, तूप आणि ताक खात नाहीत. या दिवशी वासरु असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे.
उडदाचे वडे, भात आणि गोडधोडाचे पदार्थ करुन ते गायीला खाऊ घालतात. ज्यांच्या घरी गुरे, वासरे आहेत, त्यांच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. गाईला ओवाळून केळीच्या पानावर नैवेद्य खायला दिला जाते.
वसुबारस मुहूर्त आणि पूजा विधी
वसुबारस 1 नोव्हेंबर द्वादशी तिथी दुपारी 01:21 वाजल्यापासून 02 नोव्हेंबरला सकाळी 11:31 पर्यंत आसेल.
अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. सकाळी गाय आणि वासराला स्नान घालतात.
पूजा प्रामुख्याने संध्याकाळी गोरज मुहूर्तावर केली जाते. महिला गाईच्या पायावर पाणी घालून पूजा करतात.
गाय आणि वासरांना सजवून त्यांना फुलांचा हार घालण्यात येतो. त्यांच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावतात.
यावेळी गाय-वासराला गव्हाचे पदार्थ, हरभरा आणि मूगचे नैवद्य अर्पण केले जाते.
धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही करु नका २ गोष्टी, भोगावे लागतील वाईट परिणामhttps://t.co/71FMOtMX15#AstroTipsForDhanteras|#Dhanteras2021|#DhanterasDate
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 30, 2021
संबंधित बातम्या :
Dhanteras 2021: धनत्रयोदशीला का घेतात झाडू विकत ? जाणून घ्या याचे विशेष महत्व
दीपावलीला चतुर्ग्रही योग, या 5 राशींवर होणार माता लक्ष्मीची विशेष कृपा