Diwali Special | दिवाळीत पाऊस, पावसात दिवाळी, ‘या’ टिप्स घ्या, अन् चिवडा खुसखुशीतच ठेवा!
पावसाचं वातावरण आहे, म्हणून चिवडा करायचं टाळतायत? या घ्या टिप्स आणि ठेवा चिवडा कुरकुरीत...
पावसाचं (Rain Forecast) सावट असलं तरी सण साजरा करणार नाही, तो भारतीय माणूस कसला? सेलिब्रेशनसाठी सदैव तत्पर असलेल्या लोकांना कोणताही अडथळा थांबवू शकत नाही. सणांचा आनंद अगदी साध्या-साध्या गोष्टींत शोधणं, साठवणं हेच तर जिवंतपणाचं लक्षण आहे. तर यंदाच्या दिवाळीला (Diwali Celebration) पावसाचं वातावरण असल्याने काहींचा मुड ऑफ झालाय. फराळाचे पदार्थ आतापासूनच करायचे तर तर दिवाळीपर्यंत आणि त्यानंतर कसे खुसखुशीत ठेवायचे, हाच प्रश्न घरा-घरात चर्चेतआहे. त्यातल्या त्यात चिवडा (Chivda Recipe) कसा खुसखुशीत ठेवावा, असा प्रश्न असेल तर आमच्याकडे दोन अगदी साध्या टिप्स आहेत.
कदाचित आपल्याला माहितीही असतील, पण चिवडा कुरकुरीत ठेवण्यासाठीच्या दोन टिप्स पुन्हा एकदा अवश्य पहा…
- चिवड्यात आपण जे जे साहित्य टाकतो, त्यात कढीपत्ता किंवा मिरची हे दोन घटक ओलसर असतात. बऱ्याचदा मिरची तळताना ती अर्धवट तळली जाते. त्यातील काही तुकडे कुरकुरीत होईपर्यंत तळले जात नाहीत. या ओलसर मिरचीमुळेच काही दिवसातच चिवडाही मऊसर पडतो. तर कढीपत्तादेखील असाच खुसखुशीत होईपर्यंत तळावा. जेणेकरून चिवड्यात त्याचा ओलसरपणा जाणार नाही.
- चिवडा पूर्णपणे थंड झाल्यावर नंतरच तो हवाबंद डब्यात भरून ठेवायचा. तो थोडा गरम असताना डब्यात भरून ठेवल्यास त्याचा कुरकुरीतपणा कमी होतो.
- पातळ पोह्यांचा चिवडा बनवत असाल तर जेव्हा आपण जेव्हा पोहे भाजून घेत असतो, तेव्हा चिमूटभर मीठ टाकायचं. यामुळे पोह्यांचा आकार लहान होत नाही आणि पोहे जास्त वेळ कुरकुरीत राहतात.