Supari che Upay: सुपारी ने करा हे उपाय, पैश्याची तिजोरी कधीच खाली होणार नाही
सुपारीचे हे चमत्कारीक उपाय तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवू शकतात. याने व्यवसायात आणि करिअर मध्ये यशस्वी व्हाल.
हिंदू (Hindu) धर्मात पुजेच्या साहित्यात सुपारीचा वापर महत्वाचा असतो. सुपारीला श्री गणेशाचं रूप मानलं जातं. सुपारी गणपती बाप्पांना (Ganpati) खूप प्रिय आहे. विष्णु देवाची आणि लक्ष्मी मातेच्या पुजेत देखील सुपारीचा वापर केला जातो. सुपारीचा पुजेत वापर केल्याने सुख – समृद्धी तसचं घरात बरकत येते. ज्योतीषशास्त्रानुसार तुम्ही याने अनेक प्रकारचे उपाय करू शकता. हे चमत्कारीक उपाय तुम्हाला अनेक समस्यांपासूव वाचवू शकतात. याने व्यवसायात आणि करिअर मध्ये यशस्वी (Successful) व्हाल. घरात सुख- शांती नांदेल. जाणून घेऊया सुपारीने तुम्ही कोण कोणते उपाय करू शकता.
धन लाभाचा उपाय
पुजेच्या वेळी सुपारीचा वापर केला जातो. पूजा केल्यानंतर सुपारी तुम्ही जिथे पैसे ठेवता अशा तिजोरीत ठेवा. सुपारी तुम्ही पैश्यांच्या कपाटात, तिजोरीत ठेवू शकता. त्यांने धन, संपत्ती वाढेल. सुपारीला रक्षासूत्रात गुंडाळून तिजोरीत ठेवा.
व्यवसायात यशस्वी होण्यासाठी
शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करा. त्यानंतर तिथे एक रूपया आणि एक सुपारी ठेवा. दुसऱ्या दिवशी या पिंपळाच्या झाडावरून एक पान तोडा. त्यापानात सुपारी आणि एक रूपया बांधा. त्याला लाल धाग्याने बांधून ते तुमच्या तिजोरीत ठेवा. असं केल्याने व्यवसायात यश प्राप्त होते.
अडलेल्या कामांसाठी
जर तुमची कामं बऱ्याच काळापासून अडली असतील तर तुम्ही सुपारीचा उपाय करू शकता. त्यासाठी पाकिटात दोन लवगांचे तुकडे आणि सुपारी ठेवा. कामाच्या वेळी लवगं तोंडात ठेवा. सुपारी मंदिरात अर्पण करा. त्याने तुमची अडलेली सर्व कामं सुरळीत होतील. अनेकदा अनेक प्रयत्न करून ही कामं होत नाहीत. त्यासाठी हा उपाय नक्की करून बघा. असं केल्याने कामं होतील.
लग्नात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी
लग्नाला उशीर होत असेल किंवा सुयोग्य जोडीदार मिळण्यात काही अडचणी येत असतील तर तुम्ही सुपारीचा वापर करू शकता. त्यासाठी सुपारीला अबीर लावून चंदनाच्या डब्यात ठेवा. पूर्णिमेच्या रात्री ती सुपारी मंदिरात ठेवा. त्याने लग्नकार्यात येणारी विघ्न दूर होतील.
( दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)