नोकरी मिळत नाहीये? कामं लांबणीवर जात आहेत ? मग गुळाचा वापर करा नशीब नक्की चमकेल
आयुर्वेदात गुळाला खुप महत्त्व आहे. आरोग्यासाठी गुळ खूप फायदेशीर असतो. लोक साधारणपणे हिवाळ्यातच गुळाचा वापर करतात. चवीला स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतो.
मुंबई : आयुर्वेदात गुळाला खुप महत्त्व आहे. आरोग्यासाठी गुळ खूप फायदेशीर असतो. लोक साधारणपणे हिवाळ्यातच गुळाचा वापर करतात. चवीला स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतो. गुळाचा वापर विविध घरगुती औषध म्हणूनही केला जातो. मात्र, ज्योतिषशास्त्रात देखील गुळाचे अनेक फायदे आहेत. होय, ज्योतिषशास्त्रानुसार गूळ खूप फायदेशीर मानला जातो. गूळ हा सूर्याचा कारक मानला जातो. चला तर मग जाणून घेऊयात गुळाचा वापर करुन तुम्ही तुमचे नशिब कसे चमकवू शकता.
गुळाचे उपाय
सूर्याला बळ देण्यासाठी गूळाचा वापर
जर तुमच्या कुंडलीत सूर्य कमजोर असेल तर गूळ तुमच्यासाठी गुणकारी आहे. गूळ खाऊन कोणत्याही कामाची सुरुवात करावी. त्यामुळे तुमची कामे लवकर होतील.
सूर्यदोषासाठी गूळाचा वापर
सूर्यदोष दूर करण्यासाठीही गूळ महत्त्वाचा आहे. सूर्याचा दोष कमी करण्यासाठी गुळाचा एक खडा वाहत्या पाण्यात बुडवावा. यासोबतच रविवारपासून 8 दिवस दररोज 800 ग्रॅम गहू आणि 800 ग्रॅम गूळ मंदिरात अर्पण करावा, यामुळे सूर्याशी संबंधित दोषही दूर होतात.
रखडलेल्या कामांसाठी गूळाचा वापर
खूप दिवस प्रयत्न करूनही तुमचे एखादे काम रखडले असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी घरात देशी गूळ आणा आणि वेळोवेळी थोडा-थोडा खात राहा. यामुळे तुमच्या रखडलेल्या गोष्टी देखील बनतील.
नवीन नोकरी मिळण्यासाठी गूळाचा वापर
जर तुम्ही नवीन नोकरीसाठी मुलाखतीला जात असाल तर नोकरीच्या शोधात घराबाहेर पडताना किंवा जाताना वाटेत गाईला मैदा आणि गूळ खायला द्या. यामुळे तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
मारुतीरायाची कृपा मिळावी म्हणून गूळाचा वापर
संकटमोचन हनुमान जी तुमच्यावर कृपा करू इच्छित असल्यास. तर यासाठी हनुमानजींना गूळ आणि हरभरा प्रसाद अर्पण करावा, कारण ही कृपा कायम राहते. इतकेच नाही तर सुंदरकांड करतानाही हनुमानजींना गूळ आणि हरभरा अर्पण केल्याने देव प्रसन्न होतात.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.
संबंधित बातम्या :