Eknath Shinde: कुठे आहे कामाक्षी देवीचे मंदिर, नवसाला पावते अशी ख्याती, बंडखोर एकनाथ शिंदेंनीसुद्धा घातले देवीला साकडे!

महाराष्ट्रात सत्तापालटाचे वारे वेगाने वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाने आता देवाला साकडे घालण्यास सुरवात केली आहे. नवसाला पावणाऱ्या कामाक्षी देवीचे आज बंडखोर आमदारांनी दर्शन घेतले.  या आधीसुद्धा 24 जूनला  गुवाहाटी येथे आपल्या समर्थाक आमदारांसोबत  शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shide) कामाक्षी देवीचे दर्शन घेतले होते.  (Vist Kamakhya mandir). नवसाला पावणारी देवी म्हणून कामाक्षी […]

Eknath Shinde: कुठे आहे कामाक्षी देवीचे मंदिर, नवसाला पावते अशी ख्याती, बंडखोर एकनाथ शिंदेंनीसुद्धा घातले देवीला साकडे!
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 1:28 PM

महाराष्ट्रात सत्तापालटाचे वारे वेगाने वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाने आता देवाला साकडे घालण्यास सुरवात केली आहे. नवसाला पावणाऱ्या कामाक्षी देवीचे आज बंडखोर आमदारांनी दर्शन घेतले.  या आधीसुद्धा 24 जूनला  गुवाहाटी येथे आपल्या समर्थाक आमदारांसोबत  शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shide) कामाक्षी देवीचे दर्शन घेतले होते.  (Vist Kamakhya mandir). नवसाला पावणारी देवी म्हणून कामाक्षी देवीची प्रसिद्धी आहे. हे मंदिर नेमके कुठे आहे आणि त्याचे महत्त्व (Importance) काय आहे याबद्दल माहिती  जाणून घेणार आहोत. आसाममधील गुवाहाटी (Asam Guwahati)  येथे स्थित कामाख्या शक्तीपीठावर लोकांची विशेष श्रद्धा आहे. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू यांनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे 51 भाग केले होते. ज्या-ज्या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले, ते शक्तीपीठ रुपात प्रसिद्ध झाले. असे सांगितले जाते की, देवी सतीचा योनी भाग ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणाला कामाख्या महापीठ म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार येथे देवीचा योनी भाग असल्यामुळे येथे देवी रजस्वला होते. कामाख्या शक्तीपीठ चमत्कार आणि रोचक गोष्टींनी भरलेले आहे.

kamakhya temple

मंदिरात नाही देवीची मूर्ती-

या मंदिरात देवीची कोणतीही मूर्ती नाही. येथे देवीच्या योनी भागाचीच पूजा केली जाते. मंदिरातील एक कुंड नेहमी फुलांनी झाकून ठेवलेले असते. येथून जवळच एका ठिकाणी देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. हे पीठ देवीच्या इतर सर्व पीठामध्ये महापीठ मानले जाते.

येथे देवी प्रत्येक वर्षी होते रजस्वला-

या शक्तीपीठाविषयी एक अत्यंत रोचक कथा प्रसिद्ध आहे. कथेनुसार या ठिकाणी देवीचा योनी भाग पडला होता. यामुळे देवी येथे प्रत्येक वर्षी तीन दिवसांसाठी रजस्वला होते. या काळात मंदिर बंद असते. तीन दिवसांनतर मंदिर पुन्हा उघडले जाते.

हे सुद्धा वाचा

प्रसाद रुपात भक्तांना दिला जातो ओला कपडा-

येथे प्रसाद रुपात भक्तांना ओला कपडा दिला जातो. या वस्त्राला अम्बुवाची वस्त्र म्हणतात. देवी रजस्वला असताना मूर्तीच्या जवळपास पांढरा कपडा अंथरला जातो. तीन दिवसांनी मंदिर उघडल्यानंतर पांढरा कपडा देवीच्या रजने लाल रंगाने भिजलेला असतो. त्यानंतर हे वस्त्र प्रसाद स्वरुपात भक्तांना वाटले जाते.

kamathya devi inside temple

येथे भरते अंबुवाची जत्रा

दरवर्षी अंबुबाची मेळ्यात जवळच्या ब्रह्मपुत्रेचे पाणी तीन दिवस लाल होते. पाण्याचा हा लाल रंग कामाख्या देवीच्या मासिक पाळीमुळे होतो अशी मान्यता आहे. त्यानंतर तीन दिवसांनी दर्शनासाठी येथील मंदिरात भाविकांची गर्दी होते. असे म्हटले जाते की जेव्हा देवीला तीन दिवस मासिक पाळी येते तेव्हा मंदिराच्या आत एक पांढरा कपडा पसरलेला असतो. तीन दिवसांनी जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडले जातात तेव्हा ते कापड मातेच्या राजापासून लाल रंगात भिजवले जाते. या कापडाला अंबुवाची कापड म्हणतात. हा प्रसाद म्हणून भाविकांना दिला जातो. वर्षभर भाविकांची वर्दळ असली तरी या मंदिरात दुर्गापूजा, पोहन बिया, दुर्गादेऊळ, वासंती पूजा, मदनदेऊळ, अंबुवासी आणि मनसा पूजा यांचे वेगळे महत्त्व आहे, त्यामुळे या दिवसांत लाखो भाविक येथे येतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.