गणरायाच्या सजावटीसाठी शाळावर्गाची हुबेहूब प्रतिकृती; माजी विद्यार्थ्यांची भन्नाट आयडिया

शीव येथील, शीव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलच्या एका माजी विद्यार्थ्याने घरच्या गणेश सजावटीसाठी आपल्या शाळेतील वर्गाची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे.

गणरायाच्या सजावटीसाठी शाळावर्गाची हुबेहूब प्रतिकृती; माजी विद्यार्थ्यांची भन्नाट आयडिया
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 11:14 PM

मुंबई : गणपती ही विद्येची देवता आणि शाळेत मुळाक्षरे गिरवून विद्यार्जनाचा- शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’ केला जातो, या अर्थाने शाळा आणि गणरायाचं एक वेगळंच नातं आहे. हे नातं ओळखून घरच्या गणेश सजावटीसाठी आपल्या शाळेतील वर्गाची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे शीव येथील, शीव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलच्या एका माजी विद्यार्थ्याने. (exact replica of school classroom for Ganesh decoration, an idea of D S Highschool Alumni)

सायन कोळीवाडा येथील सरदारनगर क्रमांक 1 मध्ये राहणारा गौरव सावंत हा डी. एस. हायस्कूलचा माजी विद्यार्थी. 2003 मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या गौरवने जे. जे. कला आणि उपयोजित कला महाविद्यालयातून आर्किटेक्चरची पदवी घेतली. यंदाच्या गणेशोत्सवात गौरवने त्याच्या घरच्या गणपतीच्या सजावटीसाठी चक्क शाळेच्या वर्गाची प्रतिकृती बनवली आहे. शाळेच्या वर्गाची रंगसंगती, वर्गातले बाकडे, काळ्या रंगाचा फळा आणि ‘शील घडवते तेच खरे शिक्षण’ हे शाळेचे ब्रीदवाक्य यामुळे हुबेहूब शाळाच समोर असल्याचा भास त्याच्या घरी येणाऱ्या गणेशभक्तांना आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना होत आहे.

“शाळेतल्या माझ्या जुन्या मित्रांशी बोलताना ही कल्पना मला सुचली. थ्री-डी प्रिंटिंगने शाळेचे बाकडे बनवले. 17-18 वर्षांपूर्वीची शाळा कशी होती, हे आठवून आठवून सगळ्या वस्तू बनवल्या. वर्गाच्या भिंतींचा रंग, वर्गातले दिवे, पंखे, खिडक्या, दरवाजे, फळा प्रत्येक गोष्टीची प्रतिकृती बनवली. ही सजावट करायला 10 दिवस लागले. हे सगळं करताना खूप आनंद मिळाला.” असे गौरव म्हणाला.

“विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेविषयीचं हे प्रेम बघून समाधान वाटतं. माजी विद्यार्थी गौरव सावंतची ही गणेश सजावटीची कलाकृती बघायला शाळेतले शिक्षकही उत्सुक आहेत. शाळेवर असं प्रेम आपल्या मराठी शाळेचे विद्यार्थीच करू शकतात!” असं मत डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं.

इतर बातम्या

Ganesh Chaturthi 2021 : गणेश चतुर्थीला अवश्य करुन पहा या 5 फ्युजन पाककृती

Ganeshotsav 2021 | गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ‘मोरया’चं का बरं म्हणतात? वाचा या मागची कथा…

Lord Ganesha | तुळशीने गणपतीला शाप का दिला होता, जाणून घ्या ही पौराणिक कथा…

(exact replica of school classroom for Ganesh decoration, an idea of D S Highschool Alumni)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.