Festival In August 2022: नागपंचमी, रक्षाबंधन, जन्माष्टमीसह ऑगस्ट महिन्यात येणार हे महत्वाचे सण, पहा संपूर्ण यादी
श्रावण पुत्रदा एकादशीही ऑगस्ट महिन्यात येत आहे. या एकादशीबद्दल असे मानले जाते की, ज्या जोडप्यांना संततीची इच्छा आहे त्यांनी या दिवशी भगवान विष्णूची यथायोग्य पूजा करून व्रत करावे.
हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील (Shravan Month) शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीने ऑगस्ट महिन्याची सुरुवात (Festival In August 2022) होत आहे. ऑगस्ट महिन्यात अनेक मोठे सण आणि उत्सव आहेत. या महिन्याची सुरुवात श्रावण विनायक चतुर्थी व्रत तसेच श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारपासून होत आहे. अशा स्थितीत हा संपूर्ण महिना शुभ असणार आहे. कारण या महिन्याची सुरुवात गणपतीच्या व्रताने होत आहे. याशिवाय नागपंचमी, हरतालिका तीज, जन्माष्टमी, रक्षाबंधन यांसारखे विशेष सण या महिन्यात येत आहेत. यासोबतच श्रावण पुत्रदा एकादशीही ऑगस्ट महिन्यात येत आहे. या एकादशीबद्दल असे मानले जाते की, ज्या जोडप्यांना संततीची इच्छा आहे त्यांनी या दिवशी भगवान विष्णूची यथायोग्य पूजा करून व्रत करावे. यासोबतच मुलाची प्रगतीही होते. ऑगस्ट महिन्यात येणार्या सर्व व्रत आणि सणांबद्दल जाणून घेऊया.
ऑगस्टमध्ये येणाऱ्या सणांची यादी
- 01 ऑगस्ट 2022, दिवस-सोमवार: श्रावण विनायक चतुर्थी व्रत, श्रावणाचा पहिला सोमवार
- 02 ऑगस्ट 2022, दिवस-मंगळवार: नागपंचमी, पहिले मंगळागौरी व्रत
- 03 ऑगस्ट 2022, दिवस-बुधवार: स्कंद षष्ठी व्रत
- 08 ऑगस्ट 2022, दिवस-सोमवार: श्रावण पुत्रदा एकादशी, श्रावणाचा दुसरा सोमवार
- 09 ऑगस्ट 2022, दिवस-मंगळवार: भौम प्रदोष व्रत, दुसरे मंगळागौरी व्रत
- 11 ऑगस्ट 2022, दिवस-गुरुवार: रक्षाबंधन
-
12 ऑगस्ट 2022, दिवस-शुक्रवार: श्रावण पौर्णिमा व्रत, वरलक्ष्मी व्रत
-
14 ऑगस्ट 2022, दिवस-रविवार: काजरी तीज
-
15 ऑगस्ट 2022, दिवस-सोमवार: बहुला चतुर्थी, तिसरा श्रावण सोमवार, स्वातंत्र्य दिन
- 16 ऑगस्ट 2022, दिवस-मंगळवार: तिसरे मंगळागौरी व्रत
- 17 ऑगस्ट 2022, दिवस-बुधवार: सिंह संक्रांती
- 19 ऑगस्ट 2022, दिवस-शुक्रवार: श्री कृष्ण जन्माष्टमी
- 22 ऑगस्ट 2022, दिवस- सोमवार: चौथा श्रावण सोमवार
-
23 ऑगस्ट 2022, दिवस-मंगळवार: अजा एकादशी, चौथी आणि शेवटचे मंगळागौरी व्रत
-
24 ऑगस्ट 2022, दिवस-बुधवार: प्रदोष व्रत
- 25 ऑगस्ट 2022, दिवस-गुरुवार: मासिक शिवरात्री
-
27 ऑगस्ट 2022, दिवस-शनिवार: भाद्रपद अमावस्या
-
30 ऑगस्ट 2022, दिवस-मंगळवार: हरतालिका
-
31 ऑगस्ट 2022, दिवस-बुधवार: गणेश चतुर्थी
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)