Ganesh Chaturthi | गणेश उत्सवानिमित्त वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मिळणार अनोखी भेट
Vande Bharat Express and ganesh chaturthi | वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यांना गणेश उत्सवाची भेट मिळणार आहे. पुणे येथून जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये ही भेट मिळणार आहे. आयआरसीटीसीने यासंदर्भात निर्णय घेतला आहे.
पुणे | 19 सप्टेंबर 2023 : देशभरातील 24 राज्यात लोकप्रिय झालेल्या वंदेभारत एक्स्प्रेस सुरु झाल्या आहेत. देशभरात वंदेभारत आतापर्यंत 26 ठिकाणांहून या ट्रेन सुरु आहेत. राज्यातून एकूण चार ठिकाणांवरुन वंदेभारत एक्स्प्रेस धावत आहेत. मुंबई ते गोवा, मुंबई गांधीनगर, मुंबई सोलापूर अन् मुंबई शिर्डी या गाड्या सुरु आहेत. आता या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनोखी भेट आयआरसीटी देणार आहे. गणेश उत्सवानिमित्त ही भेट देणार आहे.
काय देणार प्रवाशांना भेट
राज्यात धावणाऱ्या पाच ‘वंदे भारत’ ट्रेन आहेत. या सर्व ट्रेनमध्ये गणेशोत्सवानिमित्त भेट देण्याचा निर्णय इंडियन रेल्वे केटरिंग ॲण्ड टुरिझम महामंडळाने म्हणजे आयआरसीटीसीने घेतला आहे. वंदे भारतमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोदक देण्यात येणार आहे. यासाठी साडेचार हजार मोदकांची ऑर्डर दिली गेली असल्याची माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आली. गणेश चतुर्थी आणि दुसऱ्या दिवशीही प्रवाशांना मोदक दिले जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना जेवणाबरोबर मोदकचा स्वाद मिळणार आहे.
कोकणातील गाड्यांमध्ये मिळणार मोदक?
कोकणात धावणाऱ्या काही रेल्वे गाड्यांमध्ये मोदक देण्याचा विचार आयआरसीटीसीकडून सुरु आहे. मोदक उपलब्ध झाल्यावर कोणत्या गाड्यांमध्ये त्याचा पुरवठा होईल, यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे, असे आयआरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी पिनाकीन मोरवाला यांनी सांगितले. यामुळे प्रवाशांना गणेश उत्सवात मोदकाचा आस्वाद घेता येणार आहे. आयआरसीटीसीकडून प्रथमच हा निर्णय घेण्यात आला आहे.
वंदे भारत मेक इन इंडिया ट्रेन
वंदे भारत ही मेक इन इंडिया ट्रेन आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून ही गाडी तयार केली गेली आहे. सध्या देशातील २४ राज्यांमधून ही ट्रेन धावत आहे. सेमीहायस्पीड ट्रेन म्हणून तिची ओळख झाली आहे. वेग अन् आरामदायी प्रवासामुळे अनेक मार्गांवर प्रवाशांचा तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ही रेल्वे सुरु करण्याची मागणी होत आहे. आता गणेश उत्सवाचे औचित्य साधून मोदक देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.