Ganesh Chaturthi Utsav 2022 Live : राज ठाकरे यांच्या घरी राजकीय नेत्यांची गर्दी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते दिसल्याने चर्चा

| Updated on: Sep 05, 2022 | 4:18 PM

Ganesh Chaturthi Utsav 2022 Live Updates आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे (Ganesh Chaturthi Utsav 2022 Live). राज्यभरात गणशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. जाणून घेऊयात गणेशोत्सवाबाबतची प्रत्येक अपडेट

Ganesh Chaturthi Utsav 2022 Live : राज ठाकरे यांच्या घरी राजकीय नेत्यांची गर्दी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते दिसल्याने चर्चा

मुंबई :  आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे (Ganesh Chaturthi Utsav 2022 Live). राज्यभरात गणशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे (Ganesh Chaturthi Live Updates). गणेशमंडळांनी गणेशाच्या स्वागतासाठी भव्य-दिव्य असे देखावे साकारले आहेत. आज गणेशचतुर्थी (Ganesh Chaturthi Utsav Live) असल्याने भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. आज पहाटेपासूनच भाविकांनी लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. जवळपास 15 किलोमीटर लांबपर्यंत रांगा लागल्याचं पहायाला मिळत आहे. दुसरीकडे पुण्यात देखील गणेशोत्सवानिमित्त दगडू शेट हलवाई गणपती मंदिर आकर्ष पद्धतीने सजवण्यात आले असून, भाविकांनी गणेशाच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 31 Aug 2022 07:50 PM (IST)

    राजारामपुरी त्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा गणेश आगमन मिरवणुकीला सुरवात

    राजारामपुरी त्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा गणेश आगमन मिरवणुकीला सुरवात

    डॉल्बी आणि लेसर शो च्या झगमगाठात होतंय बाप्पांचे स्वागत

    निर्बंधमुक्त गणेशोत्सवाचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

  • 31 Aug 2022 07:50 PM (IST)

    भगवान शिवशंकरांचे निवासस्थान असलेल्या हिमालयाच्या सानिध्यात श्रीपंचकेदार मंदिरप्रासाद विराजमान

    श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीने यंदा श्री पंचकेदार मंदिराचा देखावा सादर केला आहे…भगवान शिवशंकरांचे निवासस्थान असलेल्या हिमालयाच्या सानिध्यात श्रीपंचकेदार मंदिरप्रासाद विराजमान आहे. हे मंदिर केवळ देखावा नसून या मंदिर उभारणीत अनेक प्रतीकांचा, मूर्तींचा आणि लक्ष, लक्ष दिव्यांचा वापर केलेला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा हा श्रीपंचकेदार मंदिर राजप्रासाद, अनेक देवी-देवतांच्या, व्याल, शार्दुलांच्या, यक्षगणांच्या, सुरसुन्दरी, कमलपुष्पांच्या उत्तुंग शिखरांनी शोभित झाला आहे. श्रीपंचकेदार मंदिर राजप्रासादाच्या उत्तुंग कैलास शिखरावर सुवर्ण कलशाचा आमलक असून, त्यावर सिध्द ओंकाराच्या त्रिशूल-डमरूच्या ध्वजदंडाने शोभायमान झाला आहे. नागांच्या नक्षीदार लतिन कमानीच्या शिखरावर, चारी दिशांना शिव शक्तीचे ; अर्थातच शिवपार्वती मूर्तींचे वास्तव्य आहे. याशिवाय मंदिरामध्ये तसेच रस्त्याच्या दुतर्फा २२१ झुंबर लावण्यात आली असून मारणे इलेक्ट्रीकल्स यांनी लावलेली आहेत. तर, शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे कलादिग्दर्शन, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केले आहे.

  • 31 Aug 2022 06:15 PM (IST)

    राज ठाकरे यांच्या घरी राजकीय नेत्यांची गर्दी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते दिसल्याने चर्चा

    राज ठाकरेच्या बाप्पाच्या दर्शनाला नितीन सरदेसाई व अविनाश जाधव सहकुटुंब

    आज काही राजकारणाचा विषय नाही लोक गाठीभेटी एकमेकांना देत असतात त्यामुळे त्याच्याकडे त्या दृष्टीने बघावे

    गणेश उत्सव साजरा झाल्यानंतर राज ठाकरे यांच्या दोऱ्याचे व सभेचे वेळापत्रक मिळणार

    बाईट :- नितीन सरदेसाई

    या घरातून भविष्यात महाराष्ट्राचा राजकारण किंवा महाराष्ट्राची सत्ता चालो अशी गणपती बाप्पा याच्या कडे मागणी

    शिवतीर्थावर दसरा मेळावा घेतला पाहिजे यासाठी आम्ही सगळेजण सन्माननीय राज साहेबांना भेटणार आणि ही मागणी करणार

    फक्त भारतीय जनता पार्टीची नाही तर राष्ट्रवादीचे व काँग्रेसचे नेते नेतेही राज साहेबांना भेटायला येतात मात्र योग्य वेळी राज साहेब या सर्व गोष्टी वरती योग्य ते भाष्य करतील

    हिंदुत्वाचा नेता म्हणून या देशात राज साहेब उभे राहतील

  • 31 Aug 2022 05:41 PM (IST)

    पुण्यात मानाचा पहिला कसबा गणपती विराजमान

    पुण्यात मानाचा पहिला कसबा गणपती विराजमान

    दुपारी १२ च्या सुमारास विधिवत पूजा करत मानाचा पहिला कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना

    चांदीच्या पालखीतून बाप्पांची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक

    चांदीच्या सिंहासनावर पुण्यातील मानाचा पाहिला गणपती विराजमान

  • 31 Aug 2022 01:55 PM (IST)

    दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन भाविकांसाठी खुले, दर्शनासाठी गर्दी

    दगडूशेठ गणपती पंच केदारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान

    दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन भाविकांसाठी खुले

    बाप्पाच्या दर्शनाला भक्तांची गर्दी

  • 31 Aug 2022 01:43 PM (IST)

    पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

    राज्यभरात आज गणरायाच्या आगमनाचा उत्साह दिसून येत आहे. पुणे शहरात गणेशोत्सवाचे विशेष महत्त्व आहे. पुण्यात मोठ्या थाटात गणेशाचे आगमन झाले आहे. पुण्यातील मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

  • 31 Aug 2022 01:01 PM (IST)

    सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घरी बाप्पाचे आगमन

    राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्याही घरी बाप्पांचे आगमन झाले आहे, अतुल सावे यांच्या संपूर्ण कुटुंबाने एकत्रित येत बाप्पांची प्रतिष्ठापना केली आहे. यावेळी राज्यावर कोरोना सारखं संकट पुन्हा येऊ नये, अशी प्रार्था बाप्पाकडे करण्यात आली.

  • 31 Aug 2022 12:41 PM (IST)

    देवेंद्र फडणवीसांनी केली बाप्पाची आरती

  • 31 Aug 2022 12:19 PM (IST)

    अनिल बोंडें यांच्या अमरावतीमधील घरी गणरायाचे थाटात आगमन

    भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडें यांच्या अमरावतीमधील घरी गणरायाचे थाटात आगमन

    खासदार डॉ. अनिल बोंडे व पत्नी डॉ. वसुधा बोंडें यांनी केले लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा

    यंदा आझादी का अमृत महोत्सव असल्याने साकारला तिरंगा झेंडाचा देखावा

    शेतकरी सुखी समृद्ध होऊ दे, डॉ अनिल बोंडें यांचे गणरायाला साकडे

  • 31 Aug 2022 11:47 AM (IST)

    माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन

    दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आणि भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले. यावेळी कृपाशंकर सिंह यांनी संपूर्ण कुटुंबासह बाप्पाची आरती व पूजा केली.

  • 31 Aug 2022 11:35 AM (IST)

    नाशिक महापालिकेच्या वतीने 478 गणेश मंडळांना परवानगी

    नाशिक महापालिकेकडून अखेर 478 गणेश मंडळांना परवानगी

    शेवटच्या दिवसापर्यंत महापालिकेकडे जवळपास एकूण 1000 मंडळांचे परवानगीसाठी अर्ज

    शेवटच्या मुदतीनंतर तब्बल 487 मंडळांचे अर्ज  नाकारले

    सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मनपाची परवानगी बंधनकारक

  • 31 Aug 2022 10:51 AM (IST)

    दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणपती बाप्पा होणार विराजमान

    दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणपती बाप्पा होणार विराजमान

    गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी पुर्ण

    थोड्याच वेळात निघणार बाप्पाची मिरवणूक

  • 31 Aug 2022 10:17 AM (IST)

    Pune : थोड्याच वेळात भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

    थोड्याच वेळात भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मिरवणुकीला होणार सुरुवात

    भाऊसाहेब रंगारी गणपतीचा पारंपारिक रथ सजला

    थोड्याच वेळात बाप्पा पारंपारिक रथात विराजमान होणार

    मिरवणुकीला भाविकांची प्रचंड गर्दी

  • 31 Aug 2022 09:46 AM (IST)

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देहूरोड पोलिसांचं पथसंचलन

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देहूरोड पोलिसांचं पथसंचलन

    पोलीस स्टेशन ते देहूरोडदरम्यान पोलिसांचं पथसंचलन

    गणेशोत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पथसंचलन

  • 31 Aug 2022 09:14 AM (IST)

    पुण्यातील दगडूशेठ गणपतीची मिरवणूक लाईव्ह

  • 31 Aug 2022 08:55 AM (IST)

    कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

    मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरवात

    चांदीच्या पालखीत कसबा गणपती विराजमान

    ढोल ताशांच्या गजरात कसबा गणपतीची मिरवणूक सुरु

  • 31 Aug 2022 08:48 AM (IST)

    औरंगाबादचे ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या प्रतिष्ठापना पूजेला सुरुवात

    औरंगाबादचे ग्रामदैवत संस्थान गणपतीची प्रतिष्ठापना

    संस्थान गणपती प्रतिष्ठापना पूजेला सुरुवात

    चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते  पूजा

    दुपारच्या सुमारास होणार संस्थान गणपतीची प्रतिष्ठापना

    सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत होणार प्रतिष्ठापना

  • 31 Aug 2022 08:45 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावरून गणेश पूजन लाईव्ह

Published On - Aug 31,2022 8:39 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.