Lal Baug : लालबागला ‘लालबाग’ हे नाव कसं पडलं ? त्यावेळी तिथल्या परिसरात काय होतं

गणेशाचं आगमन झाल्यापासून लालबाग परिसरात मोठी गर्दी आहे. दर्शनासाठी गणेश आगमनाच्या पहिल्यादिवसापासून मोठी गर्दी होत आहे. तिथलं मार्केट बंद होतं नाही.

Lal Baug : लालबागला 'लालबाग' हे नाव कसं पडलं ? त्यावेळी तिथल्या परिसरात काय होतं
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 5:03 PM

मुंबई : राज्यात गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) सध्या जोरात सुरु आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) गणतपती उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो. विशेष म्हणजे कोकणात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. मागच्या दोन वर्षात कोरोनाच्या काळात संसर्ग वाढू नये म्हणून निर्बंध घातले होते. पण यंदा राज्य सरकारकडून सणांच्यावरती कसल्याही प्रकारचं बंधन घातलेलं नाही. त्यामुळे राज्यात गणेश भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मुंबईत देखील सगळ्या मंडळांनी यंदाच्यावर्षी गणेशाचं आगमन वाजतगाजत केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे लालबाग (Lal Baug) परिसरात सध्या अधिक गर्दी आहे.

देशातील भक्तांची लालबागला भेट

मागच्या काही वर्षात आपण लालबाग परिसरात असलेल्या लागबागच्या राजाच्या दर्शनाला भक्तांची अधिक रांग असल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील अनेक राज्यातून तिथं दर्शनासाठी भक्तगण येतात. तसेच तिथं बॉलिवूड आणि राजकीय नेत्यांची सुद्धा हजेरी पाहायला मिळते. त्यामुळे तिथलं महत्त्व अधिक वाढलं आहे. सध्या दर्शनासाठी भक्तांच्या अधिक रांगा पाहायला मिळत आहेत.

लालबागला लागबाग नाव कस पडलं

लालबागला लालबाग नावं कसं पडलं माहित आहे का ? फिरोजशहा मेहता नावाचे एक ग्रहस्थ होते. ते राहायला होते लालबागमध्ये तिथं एक वाडी होती. त्याकाळात मुंबईतल्या अनेक ठिकाणी भराव टाकला जात होता. त्यावेळी तिथल्या वाडीत सुद्धा भराव घातला गेला. तसेच तिथल्या परिसरात अधिक लालमाती घातली गेली अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे तिथल्या वाडीला लालवाडी असं नाव पडलं होतं. त्यानंतर तिथल्या परिसरात आंबा, फणस आणि सुपारी अशी विविध झाडं लावण्यात आली. त्यामुळे वाडीचं रुपांतर बागेत झालं. अशा पद्धतीने तिथल्या परिसराचं नाव लालबाग झालं आहे. सुरेश सातपुते यांच्या ‘सलाम लालबाग’ या पुस्तकात तसा उल्लेख केला आहे.

हे सुद्धा वाचा

लालबागचं मार्केचं 24 तास सुरु

गणेशाचं आगमन झाल्यापासून लालबाग परिसरात मोठी गर्दी आहे. दर्शनासाठी गणेश आगमनाच्या पहिल्यादिवसापासून मोठी गर्दी होत आहे. तिथलं मार्केट बंद होतं नाही. तिथं खाण्याच्या तसेच गणेश पूजेच्या सगळ्या वस्तू मिळत आहेत. भक्तांची रात्रंदिवस दर्शनासाठी लाईन आहे.

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.