Pune Ganpati News : पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीच्या आरतीला सुरुवात; दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा
Pune Manache Ganpati Agaman : पुण्यातील मानाचा चौथा गणपती तुळशीबाग सार्वजनिक गणपतीची 11:30 वाजता प्राणप्रतिष्ठा होणार; तर बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यात ठिकठिकाणी जल्लोष, मानाच्या गणपतींचं आगमन, वाचा सविस्तर...
पुणे | 19 सप्टेंबर 2023 : आज गणेश चतुर्थी आहे. आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. पुण्यात गणेशोत्सवाचा मोठा जल्लोष पाहायला मिळतो. गणरायाच्या आगमनाचा जल्लोष पाहायला मिळतोय. मानाच्या गणपतीचीही प्राणप्रतिष्ठापणा केली जात आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचीही प्राणप्रतिष्ठापणा केली जात आहे. सार्वजनिक गणपतीसह घरगुती गणपती आणण्यासाठीही लोक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर गर्दी पाहायला मिळतेय. पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीच्या आरतीला सुरुवात झाली आहे. तर दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केली जात आहे. तसंच मानाच्या इतर गणपतींचीही प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येत आहे.
मानाचा पहिला आणि पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक पद्धतीने पालखीतून मिरवणूक काढत पुण्याचा मानाचा पहिला गणपती विराजमान झाला आहे. ढोल ताशांच्या गजरात सकाळी 8.30 वाजता ही मिरवणूक निघाली. तर थोड्याच वेळात म्हणजे 11.37 वाजता कसबा गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे.
पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीचीही मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 10 वाजता मिरवणूक काढण्यात आली. श्रींची मिरवणूक केळकर रस्त्यावरवरून सुरू झाली. त्यानंतर ती तांबडी जोगेश्वरी देवीच्या मंदिराकडे आली. त्यानंतर आता बाप्पा मंडपात विराजमान होणार आहे. 12:30 पर्यंत श्रींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल.
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचीही मिरवणूक निघाली. ढोल-ताशाच्या गजरात 9 वाजता श्री च्या मूर्तीची मिरवणूक निघाली. तर 11:50 वाजता श्रींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. लहान मुलांचे सहासी खेळ सुरू आहेत. यावर्षी या मंडळाचं 132 वं वर्ष आहे.
दगडूशेठ गणपतीची मुख्य मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली. हनुमान रथातून दगडूशेठ गणपतीची मिरवणूक काढण्यात आली.पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केली जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. प्राणप्रतिष्ठापनेनंतर आरती होईल आणि त्यानंतर भाविकांसाठी दर्शनाला मंदिर खुलं करण्यात येईल.
गणेशोत्सवासाठी पुणे पोलीस सज्ज आहेत. शहरभरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान शहरात 7 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनी संभाव्य दहशतवादी हल्ले आणि अनपेक्षित घटना लक्षात घेऊन बंदोबस्ताचे नियोजन केलं आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी 1,800 सीसीटीव्हीही असणार आहेत.