ganga dussehra 2022: यंदाच्या गंगा दसऱ्याला आहे विशेष महत्त्व; गंगा स्नान करताना ‘या’ चुका टाळा
हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीत गंगेला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. गंगा अतिशय पवित्र मानल्या जाते. कोणतीही गोष्ट किंवा कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुद्धीकरणासाठी फक्त गंगाजल वापरतात. पतित पावन, मोक्षदायिनी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गंगा मातेच्या प्रकट दिनी गंगा दसरा (ganga dussehra 2022) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्व नद्यांमध्ये गंगा ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. […]
हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीत गंगेला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. गंगा अतिशय पवित्र मानल्या जाते. कोणतीही गोष्ट किंवा कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुद्धीकरणासाठी फक्त गंगाजल वापरतात. पतित पावन, मोक्षदायिनी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गंगा मातेच्या प्रकट दिनी गंगा दसरा (ganga dussehra 2022) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्व नद्यांमध्ये गंगा ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, गंगा तिन्ही लोकांमध्ये वाहते, म्हणून तिला ‘त्रिपथगा’ असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार गंगा दसर्याच्या दिवशी गंगा नदीत पवित्र स्नान केल्याने मनुष्याची सर्व पाप धुतली जातात आणि जीवनातील अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर या दिवशी दान केल्याने शुभ फळ मिळते आणि विविध ग्रहांच्या नकारात्मक प्रभावापासून मुक्ती मिळते. तर्पण किंवा पितरांच्या शांतीसाठीही हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो.
गंगेत स्नान करताना ‘या’ चुका टाळा
- गंगेत स्नान करताना फक्त गंगा मातेलाच नमस्कार करावा.
- शरीरातील घाण इत्यादी गंगेत टाकू नका तसेच कपडे धुवू नका.
- गंगेत स्नान केल्यानंतर शरीर कधीही पुसू नये. शरीर स्वतःच कोरडे होऊ द्या, मग कपडे घाला.
- सुतक काळातही गंगेत स्नान करता येते, परंतु स्त्रियांनी प्रदोष काळात गंगेत स्नान करू नये.
- नदीत कोणत्याही प्रकारची घाण, कचरा इत्यादी टाकू नये. हा गंगा मातेचा अनादर मानला जातो.
- गंगेला शुद्ध ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे. एखादी व्यक्ती घाण करीत असेल तर तिला टोकण्यास संकोच करू नका
यावेळी गंगा दसरा इतका खास का आहे?
गंगा दसरा 2022 च्या दिवशी हस्त नक्षत्र असेल. या नक्षत्राला माता गंगा पृथ्वीवर अवतरली होती, असे मानले जाते, त्यामुळे तिचे महत्त्व आणखी वाढते. हस्त नक्षत्रात केलेली सर्व कामे फलदायी ठरतात अशी मान्यता आहे.
हस्त नक्षत्र सुरुवात: 9 जून 2022 रोजी पहाटे 4:31 वाजता
हस्त नक्षत्र समाप्ती: 10 जून 2022 सकाळी 04:31 वाजता
या गंगा दसर्याला तयार होत आहेत 4 महायोग
गंगा दसर्याच्या दिवशी वृषभ राशीत सूर्य आणि बुध एकत्र मिळून बुधादित्य योग तयार होत आहेत. यासोबतच रवियोग, व्यतिपात योग आणि गजकेसरी योगही या दिवशी तयार होत आहेत.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)