Gayatri Mantra : 99 टक्के लोकांना नाही माहिती गायत्री मंत्राबद्दलचे हे तथ्य, मंत्रजाप करण्याआधी करावा लागतो हा विशेष विधी

हा एवढा प्रभावी मंत्र आहे ज्याच्या जपाने परमपिता परमात्मा देवादि देव महादेव भगवान शिव प्रसन्न होतात. या मंत्राचा नियमित जप करून लंकापती रावणाने भगवान शंकराला प्रसन्न केले होते.

Gayatri Mantra : 99 टक्के लोकांना नाही माहिती गायत्री मंत्राबद्दलचे हे तथ्य, मंत्रजाप करण्याआधी करावा लागतो हा विशेष विधी
गायत्री मंत्रImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 11:45 AM

मुंबई : हिंदू धर्मात देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे मंत्र रचले गेले आहेत. हे मंत्र सिद्ध केल्याने भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त होते. आज आपण गायत्री मंत्राबद्दल (Gayatri Mantra Benefits) जाणून घेणार आहोत. हा एवढा प्रभावी मंत्र आहे ज्याच्या जपाने परमपिता परमात्मा देवादि देव महादेव भगवान शिव प्रसन्न होतात. या मंत्राचा नियमित जप करून लंकापती रावणाने भगवान शंकराला प्रसन्न केले होते. भगवान शिव व्यतिरिक्त, गायत्री मंत्र माता गायत्री आणि सूर्यदेव यांना देखील समर्पित आहे. या मंत्राच्या सामर्थ्याने मनावर नियंत्रण ठेवता येते. या महान मंत्राने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात.

गायत्री मंत्र (Gayatri Mantra Rules) हा सर्व शक्तीशाली मानला जातो आणि कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. या मंत्रात अनेक शक्ती आहेत, ज्याचा जप केल्यावरच तुम्हाला जाणवेल. ब्रह्मऋषी विश्वामित्र यांनी ऋग्वेदातही या मंत्राचा उल्लेख केला आहे. परंतु या मंत्राशी संबंधित दोन विधाने आहेत, पहिली म्हणजे या मंत्राचा जप स्त्रियांना निषिद्ध आहे. दुसरे म्हणजे पुरुषांनी यगोपवित धारण केल्याशिवाय गायत्री मंत्राचा जप करू नये.

गायत्री मंत्राचा जप स्त्रियांनी का करू नये

वैदिक प्रथेनुसार गायत्री मंत्राला शिव, ब्रह्मा, वसिष्ठ, शुक्राचार्य आणि विश्वामित्र यांचा शाप आहे. वास्तविक, या मंत्राचा चुकीचा वापर होऊ नये, म्हणून शापापासून मुक्ती मिळाल्यावरच या मंत्राचा जप करावा. मंत्र जपण्यापूर्वी त्याची शापमुक्ती पद्धत अवलंबली जाते. शापमुक्ती पद्धतीशिवाय गायत्री मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती मिळते. त्यामुळेच याविधीचे पालन न करताच मंत्रजाप केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारची सिद्धी मिळू शकत नाही. गायत्री मंत्र शापमुक्तीच्या पद्धतीशिवाय सिद्ध होऊ शकत नाही. साधारणपणे 90 टक्के लोकं गायत्री मंत्राचा सहज जप करतात. त्यामुळे त्यांना या मंत्राचे पूर्ण फळ कधीच मिळत नाही.

हे सुद्धा वाचा

मंत्राशी संबंधीत तथ्य

या मंत्राशी संबंधित काही तथ्ये आहेत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. यातील एक तथ्य म्हणजे महिलांनी गायत्री मंत्राचा जप करू नये. शास्त्रानुसार महिलांनी गायत्री मंत्राचा जप करू नये. या वस्तुस्थितीमागे धार्मिक तसेच वैद्यकीय कारण आहे. असे मानले जाते की शतकानुशतके स्त्रिया देखील पवित्र धागा घालत असत आणि पुरुषांप्रमाणे धार्मिक कार्यात भाग घेत असत. पण काही काळानंतर परिस्थिती बदलली. महिलांनी गायत्री मंत्राचा जप न करण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे मासिक पाळी. हिंदू धर्मानुसार महिलांनी मासिक पाळीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यात आणि पूजेत भाग घेऊ नये. त्यामुळे महिलांनी गायत्री मंत्राचा जप करू नये.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.