Hanuman Chalisa : हनुमान चालीसाचे हे उपाय आहेत अत्यंत प्रभावी, सर्व समस्या होतात दूर
रोज हनुमान चालीसाचे पाठ केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. कसलीही समस्या असो, हनुमान चालीसाचा पाठ केल्याने समस्या दूर होते.
मुंबई : हिंदू धर्मग्रंथांनुसार, कोणत्याही देवतेला प्रसन्न करण्यासाठी, त्यांच्या मंत्रांचा जप आणि चालीसा पाठ हा अत्यंत प्रभावी उपाय मानन्यात आला आहे. असे म्हणतात की यामुळे देवता लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. प्रत्येक चालीसा 40 (Hanuman Chalisa) दिवस सतत पाठ केल्यास जीवनातील अनेक अडचणी संपतात. दुःखातून मुक्ती मिळते आणि अनेक संकटातून मुक्ती मिळते.
हनुमान चालीसा वाचल्याने होतील सर्व संकटे दूर
- हनुमान चालिसाचा पाठ केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. जर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवायचा असेल, तर प्रत्येक काम करताना संकोच असेल तर हनुमान चालिसाचा जप केल्यास फायदा होईल.
- हनुमान चालिसाचा पाठ केल्याने व्यक्तीची आर्थिक समस्या दूर होते असे म्हटले जाते. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या येत असतील तर सकाळी लवकर उठल्यानंतर एकदा हे वाचन करा. त्यामुळे आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते.
- हनुमान चालिसाचा पाठ केल्याने भीती दूर होते असे म्हणतात. अशा वेळी कोणत्याही प्रकारची भीती आणि शत्रूंची भीती टाळण्यासाठी हे पठण करा. काळी जादू, चेटूक, भूत, कोणतीही दुर्घटना आणि अकाली मृत्यूची भीती घालवण्यासाठी हनुमान चालिसाचा पाठ करा. यामुळे तुमची सर्व भीती दूर होऊ शकते.
- शत्रूपासूनही रक्षा होते. हनुमान चालिसाचे नियमित पठण केल्यास व्यक्तीला अनिष्ट शत्रूपासून मुक्ती मिळते. तुमचे वाईट चिंतनाऱ्या लोकांना अद्दल घडते.
- कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करावे, असे सांगितले जाते. जर तुम्हाला वारंवार दुखापत होत असेल किंवा अपघाताचा बळी ठरत असाल तर हनुमान चालीसा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
- हनुमान चालीसाचा उपाय मंगळवारी सुरू करणे फायदेशीर ठरते. विशेषत: मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण केल्यास हनुमानजी प्रसन्न होतात. तसेच कुंडलीत मंगळाची स्थिती मजबूत होते.
- आत्मविश्वास वाढतो यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. बर्याच लोकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो, ज्यामुळे त्यांना यश मिळवता येत नाही. दररोज हनुमान चालीसाचा पाठ केल्याने आत्मविश्वास वाढतो.
- भीतीपासून मुक्ती मिळते दररोज हनुमान चालीसाचे पाठ केल्याने भीतीपासून मुक्ती मिळते. आयुष्यात बर्याच वेळा एखाद्या व्यक्तीला अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून भीती वाटू लागते. हनुमान चालीसाचे पठण केल्याने कशाचीही भीती वाटत नाही.
- आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते हनुमान चालीसाचे पठण केल्याने व्यक्तीला आर्थिक त्रासातून मुक्तता मिळते. जर तुम्हाला कर्जामुळे त्रास होत असेल तर दररोज हनुमान चालीसाचे पठण करावे. असे केल्याने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास प्रारंभ होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)