Hartalika Teej Fasting Rules : महिलांनी हरतालिकेच्या तिथीला ‘ही’ काम करू नये!

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका व्रत साजरे केले जाते. या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकर यांची पूजा करून आपल्या जोडीदाराच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते.मुंब

Hartalika Teej Fasting Rules : महिलांनी हरतालिकेच्या तिथीला ‘ही’ काम करू नये!
हरतालिकाImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 8:30 PM

मुंबई : हरतालिकेच्या तिथीला विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. तिथेच अविवाहित मुली (Unmarried Girls) आपल्या मनपसंत जोडीदारासाठी हे व्रत करतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका व्रत (Hartalika fast) साजरे केले जाते. या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकर यांची पूजा केली जाते. हरतालिका तिथीचे व्रत सर्व व्रतांपैकी सर्वात कठीण मानले जाते. हे व्रत करताना अनेक गोष्टी पाळाव्या लागतात. कारण अनेकवेळा स्त्रिया जाणून-बुजून या चुका करतात आणि त्यांचे व्रत यशस्वी होत नाही. व्रत कितीही कठीण असो, त्यात आत्मसंयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हरतालिकेच्या व्रतामध्ये हा नियम लागू आहे. व्रत करणाऱ्या महिलांनी या विशेष दिवशी क्रोध आणि रागापासून दूर राहावे. आपल्या भावनांवर संयम (Restraint on emotions) ठेवावा. जाणून घ्या, या व्रताच्या दिवशी महिलांनी कोणत्या चूका टाळल्या पाहीजे.

स्वतः वर संयम ठेवा

अमरउजाला ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, हरतालिका व्रत पूर्ण सात्वीक आणि आधात्मिक भावनेतून पूर्ण करता आले पाहीजे. यासाठी, तुमच्या मनात कितीही राग येत असला तरी स्वतःवर संयम ठेवूनच तुम्ही तुमचे व्रत यशस्वी करू शकता. म्हणून हरतालिका व्रत असताना स्वतःवर पूर्ण संयम ठेवा.

झोपणे निषिद्ध आहे

हरतालिकेचे उपवास देखील कठीण मानले जातात. कारण या दिवशी महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी पूजा करतात. यासोबतच उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी झोपू नये. त्यापेक्षा संपूर्ण रात्र देवाच्या आराधनेमध्ये घालवली पाहिजे. आणि उपवास सकाळीच सोडावा.

हे सुद्धा वाचा

वाईट शब्द बोलू नका

व्रताच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवावे असे म्हणतात. जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अपशब्द तोंडातून बाहेर पडू नयेत. व्रतामध्ये लहान किंवा मोठ्यांना अपशब्द बोलू नयेत तसेच मन दुखावणारे काहीही बोलू नये.

दूध पिऊ नका

जर तुम्ही हरतालिकेचा उपवास करत असाल तर या उपवासात तुम्ही दुधाचे सेवन करू नये. पुराणात सांगितले आहे की, या दिवशी दूध पिणारी स्त्री पुढील जन्मात सर्प योनीत जन्म घेते.

पतीसोबत संयम ठेवा

अनेक वेळा स्त्रिया पतीच्या एखाद्या गोष्टीवरचे नियंत्रण गमावतात. पण उपवासाच्या दिवशी वाद टाळा आणि प्रत्येक छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. जेणेकरून व्रत पूर्ण करता येईल. दरम्यान, अनेकवेळा स्त्रिया जाणून-बुजून या चुका करतात आणि त्यांचे व्रत यशस्वी होत नाही. व्रत कितीही कठीण असो, त्यात आत्मसंयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...