AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hindu Ekta Mahakumbh| प्रभू रामचंद्रांनी स्वतःची संस्कृती कधीही दुसऱ्यावर थोपवली नाही; श्री चिन्ना जीयर स्वामींनी सांगितला हिंदुत्वाचा मूलमंत्र

श्री चिन्ना जीयर स्वामी म्हणाले की, आपापल्या पंथाचे, धर्माचे संरक्षण करून एका छताखाली राहणे म्हणजेच हिंदू असणे आहे. आपण सर्वजण असेच राहू. आमच्या धर्माची श्रद्धा आचरणात आणण्यासाठी कटिबद्ध असू, असे आवाहन त्यांनी केले.

Hindu Ekta Mahakumbh| प्रभू रामचंद्रांनी स्वतःची संस्कृती कधीही दुसऱ्यावर थोपवली नाही; श्री चिन्ना जीयर स्वामींनी सांगितला हिंदुत्वाचा मूलमंत्र
श्री चिन्ना जीयर स्वामी.
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 5:05 PM

चित्रकूटः प्रभू रामचंद्रांनी वालीला सिंहासनावरून हटवले. त्याच्या जागी सुग्रीवला राजा केले. प्रभू रामंचंद्रांनी रावणाला सिंहासनावरून हटवले. त्याच्या जागी बिभीषणाला गादीवर बसवले. या दोन्ही ठिकाणच्या राजपदावर आपला माणूस बसवला नाही. विशेष म्हणजे त्यांच्यावर आपली संस्कृतीसुद्धा थोपवली नाही. लादली नाही. त्यांना तुम्ही तुमचा धर्म व्यवस्थित सांभाळा असा सल्ला दिला. हेच खरे हिंदुत्व आहे, असा मूलमंत्र प्रसिद्ध श्री चिन्ना जीयर स्वामी (Shri Chinna Jiyar) यांनी दिला. ते चित्रकूट येथे सुरू असलेल्या हिंदू एकता महाकुंभमध्ये (Hindu Ekta Mahakumbh) बोलत होते. विशेष म्हणजे या सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) सुद्धा उपस्थित होते.

आपापला धर्म सांभाळा…

चित्रकुटमधल्या हिंदू एकता महाकुंभला देशभरातून आलेले हजारो संत आणि महंत उपस्थित आहेत. यावेळी श्री चिन्ना जीयर स्वामी यांनी आपल्या रसाळ वाणीने साऱ्यांना मंत्रमुग्ध केले. ते म्हणाले, प्रभू रामचंद्रांनी संसाराचे नियम आपल्या आचरणातून दाखवून दिले. ते वनामध्ये आले. केवटासोबत राहिले. ऋषींसोबत राहिले. पुढे जावून ते वानरांसोबतही राहिले. तिथे असलेल्या दुष्ट लोकांना शिक्षा दिली. त्यांना हटवले. मात्र, आपली संस्कृती त्यांच्यावर कधीही थोपवली नाही. प्रभू रामचंद्रांनी वालीला हटवले. त्याच्या जागी सुग्रीवला राजा केले. आता तुमचा क्रम जसा असेल तो सुरक्षित ठेवा, असे सांगून त्यांच्याकडे कारभार सोपवला. प्रभू रामंचंद्रांनी रावणाला सिंहासनावरून हटवले. मात्र, तिथल्या गादीवर आपला माणूस ठेवला नाही. तर बिभीषणाला राज्य दिले. आणि तुम्ही तुमचा धर्म व्यवस्थित सांभाळा असे सांगितले. आजकाल आपण आपला धर्म सांभाळणे खूप आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले.

हिंदू धर्मात अनेक पंथ…

श्री चिन्ना जीयर स्वामी म्हणाले की, हिंदू धर्मात अनेक प्रकारचे पंथ आहेत. अनेक संपद्राय आहेत. द्वैत आहे, अद्वैत आहे. अनेक भेदाभेद आहेत. खूप सारे धर्म आहेत. अद्वैतामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. तरीही हे सर्वजण आपापल्या क्रमाचे संरक्षण करतात. आपल्या राज्य घटनेनेही त्यांना एक संरक्षण दिले आहे. आपापल्या पंथाचे, धर्माचे संरक्षण करून एका छताखाली राहणे म्हणजेच हिंदू असणे आहे. आपण सर्वजण असेच राहू. आमच्या धर्माची श्रद्धा आचरणात आणण्यासाठी कटिबद्ध राहू, असे आवाहन त्यांनी केले.

साऱ्यांच्या मर्यादा वाढवू…

श्री चिन्ना जीयर स्वामी म्हणाले की, मला नुकतीच कुरुक्षेत्राला जाण्याची संधी मिळाली आणि आता चित्रकुटला येण्याची. एका गोष्टीबद्दल सांगावे वाटते. जेव्हा केव्हा उत्सव होतो, तेव्हा त्या भागाला आम्ही खूप सजलेले, शृंगारीत पाहतो. मात्र, त्यानंतर आपले धर्मबिंदू, धर्मक्षेत्राचे आपण विस्मरण करतो. आपले जितके धर्मक्षेत्र, तीर्थक्षेत्र आहेत त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे, त्यांना सुशोभित ठेवणे आपले कर्तव्य आहे. या क्षेत्राचे महत्त्व केवळ आपल्यासाठीच नाही, तर येणाऱ्या लोकांना दाखवण्यासाठीही त्यांना सुशोभित ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या भारतभूमीत प्रत्येक कण आणि कण महत्त्वाचा आहे. त्याचे संरक्षण करावे. तिथले पाणी, भूमी, वृक्ष, पर्वत, दगड, लोक या साऱ्यांची मर्यादा वाढवण्याचे आपण प्रयत्न करू. हे आपण जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत दुसऱ्याची मान्यता आपल्याला मिळणार नाही, अशा शब्दांत त्यांनी उपदेशही केला.

स्वामी रामानुजाचार्यांचे स्मरण…

श्री चिन्ना जीयर स्वामी म्हणाले की, आपल्या देशामध्ये अनेक पंथ आहेत. या साऱ्या भक्तीपंथांचे बीजारोपण सुमारे एक हजारवर्षांपूर्वी रामानुजाचार्य स्वामींनी केले. तेव्हा ते म्हणालेले, मी नरकात गेलो तरी सर्वांना मंत्र देऊन त्यांचा उद्धार झालेला पाहू इच्छितो. त्यांनी जाती-पाती, कुल, उच आणि नीचता यापेक्षा वर जाऊन सर्वांशी नाते प्रस्थापित केले. त्यांनी त्या काळात हरिजनांना मंदिरात येण्याचा हक्क दिला. त्यांचे स्मरण ठेवावे. हे स्मरण ठेवत आम्ही हैदराबाद येथील भाग्यनगरमध्ये त्यांच्या 216 फूट उंच अशा पंचधातूच्या मूर्तीचे अनावरण केले आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

इतर बातम्याः

Obc reservation : ठाकरे सरकारला झटका, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार, सुप्रीम कोर्टाचा आदेश, पुढची सुनावणी नव्या वर्षात

आता वाईनचा सुकाळ होणार? किराणा दुकानावरही मिळणार, पहिल्यांदाच टॅक्सची घोषणा, महागणार की स्वस्त होणार?

OBC Reservation | सरकारचे अज्ञान, अहंकार आणि प्रचंड दुर्लक्ष नडले; पकंजांची घणाघाती टीका, निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी

अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम.
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान.
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार.
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक.
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.