Hindu Nav Varsh 2025: मार्च महिन्यातील ‘या’ दिवसापासून हिंदू नववर्षाला सुरूवात होणार, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त…
Hindu Nav Varsh 2025 Date: दरवर्षी हिंदू नववर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होते. हिंदू धर्मात हिंदू नववर्षाचे खूप महत्त्व आहे. अशा परिस्थितीत, या वर्षी हिंदू नववर्ष कधी सुरू होत आहे चला जाणून घेऊया. या हिंदू नववर्षाचा राजा आणि मंत्री कोण असेल?

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 1 जानेवारीला साजरा केला जातो. परंतु तुम्हाला माहिती आहे का? हिंदू धर्मामध्ये नेमकं कधी साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊया. हिंदू धर्मग्रंथांनुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवीन वर्ष सुरू होते. हिंदू परंपरेमध्ये चैत्र नविन वर्षाला अगदी थाटामटामध्ये साजरा केली जाते. या दिवशी प्रत्येक हिंदू घरामध्ये सकारात्मक वाततावरण निर्माण होते. सर्वांच्या घराबाहेर रंगीबिरंगी रांगोळ्या खेळल्या जातात. हिंदू धर्मानुसार, चैत्र महिन्याच्या नवीन वर्षाला सुती आणि नवीन कपडे घालून देवाकडे प्राथना केली जाते. या दिवसाला संपुर्ण महाराष्ट्राघ्ये गुढी पाडवा म्हणून ओळखला जातो. या दिवशी प्रत्येक घरामध्ये गुढी उभारली जाते.
सम्राट विक्रमादित्य यांनी इ.स.पूर्व 57 मध्ये विक्रम संवत सुरू केला. ज्या दिवशी हिंदू नववर्ष सुरू होते, त्याच दिवशी चैत्र नवरात्र देखील सुरू होते. ब्रह्माजींनी हिंदू नववर्षाच्या दिवसापासून विश्वाची निर्मिती सुरू केली. भगवान श्रीराम आणि धर्मराज युधिष्ठिर यांचा राज्याभिषेकही याच दिवशी झाला. हिंदू नववर्षाच्या राजा आणि मंत्र्याबद्दल जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत, 2025 या वर्षी हिंदू नववर्षाचा राजा आणि मंत्री कोण असेल ते जाणून घेऊया.
हिंदू कॅलेंडरनुसार, या वर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील शुक्ल प्रतिपदा तारीख 30 मार्च रोजी आहे. अशा परिस्थितीत, हिंदू नववर्ष या दिवसापासून सुरू होईल. या दिवशी, सूर्य आणि चंद्र दोघेही गुरु गुरु, मीन राशीत भ्रमण करतील. हिंदू नववर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. नवरात्रीसोबतच या दिवशी गुढीपाडवा देखील साजरा केला जातो. हिंदू नववर्षाचा राजा सूर्य आहे. खरंतर, यावेळी हिंदू नववर्ष रविवारपासून सुरू होत आहे. या दिवसाचा स्वामी सूर्यदेव मानला जातो. कारण हा दिवस हिंदू धर्मग्रंथांमध्ये भगवान सूर्याला समर्पित आहे आणि ज्या दिवशी हिंदू नववर्ष सुरू होते, त्या दिवशी त्या दिवसाचा स्वामी असलेल्या देवतेला राजा मानले जाते. या हिंदू नववर्षाचा सेवक देखील सूर्य देव आहे. यावेळी हिंदू नववर्ष विक्रम संवत २०८२ असेल.
हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 29 मार्च रोजी दुपारी 4:27 वाजता सुरू होईल आणि 30 मार्च रोजी दुपारी 12:49 वाजता संपेल. अशा परिस्थितीत, उदय तिथीनुसार, यावर्षी चैत्र नवरात्र 30 मार्चपासून सुरू होईल, तर ती 7 एप्रिल रोजी संपेल. गुढी पाडव्याच्या दिवशी तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक करण्यासाठी मुख्य द्वाराजवळ जीवा लावा. त्यानंतर रात्री देवासमोर गयत्री मंत्राचा जप करा. यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि महत्तावाच्या कामामध्ये प्रगती होते.