Holashtak 2022 : 10 मार्चपासून सुरू होणार होळाष्टक, जाणून घ्या यात शुभ आणि अशुभ नेमके काय?

होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला (Purnima) साजरा केला जातो. होळीच्या आधीच्या आठ दिवसांना होळाष्टक (Holashtak) म्हणतात. यावेळी 10 मार्चपासून होळाष्टक सुरू होणार आहे. होळाष्टक हा शब्द होळी आणि अष्टक मिळून बनला आहे. होलाष्टकादरम्यान, गृहप्रवेश, मुंडण, लग्न, विवाह इत्यादी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.

Holashtak 2022 : 10 मार्चपासून सुरू होणार होळाष्टक, जाणून घ्या यात शुभ आणि अशुभ नेमके काय?
होळाष्टकचे महत्व आणि कथा जाणून घ्या
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 2:46 PM

मुंबई : होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला (Purnima) साजरा केला जातो. होळीच्या आधीच्या आठ दिवसांना होळाष्टक (Holashtak) म्हणतात. यावेळी 10 मार्चपासून होळाष्टक सुरू होणार आहे. होळाष्टक हा शब्द होळी आणि अष्टक मिळून बनला आहे. होलाष्टकादरम्यान, गृहप्रवेश, जावळ काढण्याचा कार्यक्रम, लग्न, इत्यादी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. मात्र ही वेळ पूजेच्या (Worship) दृष्टीने अतिशय शुभ मानली जाते. ज्योतिषांच्या मते, इतरही कारणे आहेत, ज्यामुळे होळाष्टकची वेळ शुभ कार्यासाठी योग्य मानली जात नाही.

हे ज्योतिष कारण आहे

ज्योतिषांच्या मते, होळाष्टकच्या दिवसांमध्ये वातावरणात नकारात्मकतेचा प्रभाव असतो. सर्व ग्रहांचा प्रभाव नकारात्मक होतो. अष्टमी तिथीपासून होळाष्टक सुरू होते. अशा स्थितीत अष्टमीला चंद्र, नवमीला सूर्य, दशमीला शनि, एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरु, त्रयोदशीला बुध, चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू खूप नकारात्मक राहतो.

सध्याच्या वातावरणाचा परिणाम व्यक्तीच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही होतो. ज्यामुळे एखादी व्यक्ती चुकीचा निर्णय घेऊ शकते. याशिवाय या काळात कोणतेही शुभ कार्य केले तरी ग्रहांच्या नकारात्मक प्रभावामुळे सहकार्य मिळू शकत नाही. अशावेळी तुमचे काम बिघडू शकते. त्यामुळे होलाष्टकात देवाचे नाव घेणे आणि पूजा करणे हे अत्यंत शुभ आहे, परंतु शुभ कार्ये वर्ज्य आहेत.

ही कथा वाचा!

ही कथा प्रल्हादची आहे. पौराणिक कथेनुसार, प्रल्हाद जो लहान मुलगा होता, परंतु नारायणाचा मोठा भक्त होता, त्याचे वडील हिरण्यकशिपू त्याच्या भक्तीमुळे खूप चिडले होते. नारायणाची भक्ती थांबवण्यासाठी त्यांनी या आठ दिवसांत प्रल्हादचा अनेक प्रकारे छळ केला. मात्र, नारायणाच्या कृपेने त्यांना प्रल्हादच्या केसांनाही धक्का लावता आला नाही. पौर्णिमेच्या दिवशी चिडून त्यांनी आपली बहीण होलिकाला प्रल्हादला तिच्या मांडीवर बसवून मारण्यास सांगितले.

होलिका प्रल्हादला आपल्या मांडीत बसवताच ती आगीच्या ज्वाळांमध्ये भस्मसात झाली. तर प्रल्हादला काहीच झाले नाही. तेव्हापासून होलिका दहन दरवर्षी पौर्णिमेच्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून केले जाते. अष्टमी ते पौर्णिमा हे दिवस शुभ कार्यासाठी चांगले मानले जात नाहीत. मात्र पौर्णिमेनंतर रंगांची होळी खेळून चांगल्याचा विजय साजरा केला जातो.

संबंधित बातम्या : 

Amalaki Ekadashi 2022 : अमलकी एकादशीच्या दिवशी पूजा करताना ही कथा वाचा, जाणून घ्या शुभ मुहूर्त!

शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने शनिदेव का प्रसन्न होतात?, जाणून घ्या पौराणिक कथा!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.