Sita Navami 2022: घरात सुख शांती हवी असेल तर, सीता नवमीच्या दिवशी ‘हे’ उपाय करायला विसरू नका
सीता नवमीच्या दिवसा ही राम नवमी इतकाच महत्वपूर्ण आहे. यादिवशी मनोभावे प्रभु श्रीराम आणि सीता माता यांची पूजा केली की तुमच्या जीवनात आनंद येतो. तसंच जीवनातील अनेक समस्या नाहीशा होतात.
राम नवमी इतकंच सीता नवमीला ही महत्व आहे. यादिवशी सीता माता आणि प्रभु श्री राम यांची पूजा केल्याने तुमचे पाप नाहीसे होते. सर्व कष्टांतून तुमची मुक्ती होते. तुम्ही इथे सांगितल्या गेलेल्या उपयांचा वापर करून सर्व त्रासापासून सुटका करून घेऊ शकता.
व्यक्ती नियमीत सीता रामाच्या नावाचा जप करत असेल तर त्याचं पाप धुतलं जातं. मन पवित्र होतं. अशा व्यक्तिस मोक्ष प्राप्त होतो. शास्त्रात प्रभु श्री रामांना (Shri Ram) नारायण आणि सीता मातेला (Sita Mata) लक्ष्मी मातेचा (Laxmi Mata)अवतार मानलं गेलं आहे. ज्याव्यक्तीवर सीता मातेची कृपा असते त्याव्यक्तीवर प्रभु श्री रामांची कृपा होत जाते. दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला सीता नवमी (Sita Navami)साजरी केली जाते. यादिवशी सीता माता प्रकट झाल्या असं मानलं जातं. राम नवमीच्या बरोबर एक महिन्यानंतर सीमा माता धर्तीवर प्रकट झाल्या होत्या. जनक राजांची कन्या असल्याने सीता मातेला जानकी देखील म्हटलं जातं, म्हणून यादिवसाला जानकी जयंती देखील म्हणतात. ह दिवस अत्यंत शुभ मानला जातो. जर तुमच्या जीवनात कोणत्या प्रकारच्या समस्या असतील तर तुम्ही सीता नवमीच्या दिवशी काही विशेष उपाय करू शकता. त्याने तुमच्या जीवनात बदल घडू शकतो.
धन संकट
तुमच्या जीवनात धन संकट सुरू असेल आणि यापासून सुटकारा मिळविण्यासाठी तुम्ही प्रभु श्रीरामांच्या मंदिरात जा आणि केसरिया रंगाचा झेडा लावा. प्रभु श्रीराम आणि सीता मातेला पिवळ्या रंगाची वस्र अर्पण करा. पिवळ्या रंगाची फुलांची माळ अर्पण करा. तांदळाचा नैवेद्य दाखवा. प्रभु रामांच्या मंत्राचा जप करा. श्रीराम प्रसन्न असले की सीता माता आणि हनुमान देखील प्रसन्न असतात असं मानतात. अशा लोकांची सर्व संकंट दूर होतात. प्रभु श्रीरामाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही यामंत्रचा जप करू शकता.
श्री राम राम रमेति, रमे रामे मनोरमे, सहस्त्रनाम तत्तुल्यं, श्री राम नाम वरानने
तुमच्या विशेष मनोकामना पूर्ण होण्यासाठी
जर तुमच्या काही विशेष मनोकामना असतील तर तुम्हाला हा उपाय केलाच पाहिजे. तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्रीराम मंदिरात जाऊन हनुमानाच्या मूर्तीचे शेंदूर सीता मातेच्या चरणांला लावा. असं दिवसातून सकाळ, दुपार आणि संध्याकाळ तीन वेळा करा. तीन्ही वेळा तुमच्या मनातील इच्छा सीता मातेला सांगा. असं केल्याने जीवनातील मोठयातील मोठं संकट टळतं अशी मान्यता आहे. व्यक्तीची मनोकामना पूर्ण होते.
बाधांपासून मुक्ती मिळविण्यासाठी
जर तुमच्या कोणत्या कार्यात सारख्या बाधा येत असतील, तर सीमा नवमीच्या दिवशी सीता माता आणि प्रभु श्रीरामांची विधीवत पूजा करा. जानकी स्तोत्रांचे पठण करा. राम स्तुती चे पठण करा. त्यानंतर सुंदरकांड वाचा. त्यानंतर क्षमायाचना करून देवाला तुमच्या जीवनातील बाधा दूर करण्याची प्रार्थना करा. याउपायाने तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट दूर होईल.