मुस्लिम जुमादिल-आखिर मासारंभ म्हणजे काय?, जाणून घ्या या महिन्याचं इस्लाममधील महत्त्व
इंग्रजी कालगणनेनुसार नवीन वर्ष सुरू झालं आहे. थोडक्यात इंग्रजी वर्षाचा मासारंभ सुरू झाला आहे. तर इस्लामिक कालगणनेनुसार जुमादिल-आखिर मासारंभ सुरू झाला आहे.

मुंबई: इंग्रजी कालगणनेनुसार नवीन वर्ष सुरू झालं आहे. थोडक्यात इंग्रजी वर्षाचा मासारंभ सुरू झाला आहे. तर इस्लामिक कालगणनेनुसार जुमादिल-आखिर मासारंभ सुरू झाला आहे. जुमादिल आखिर या महिन्याचं इस्लाममध्ये काय महत्त्व आहे? इस्लामिक कॅलेंडरमध्ये या महिन्याचं स्थान कितवं आहे? या महिन्याचं नाव कसं पडलं? याचा घेतलेला हा आढावा.
इस्लामिक कालगणना कशी होते?
इस्लामिक कॅलेंडर चंद्र कॅलेंडरवर आधारलेले आहे. हिजरी संवतमध्ये 12 चंद्र मास असतात. त्यात 29 आणि 30 दिवसाचे हे महिने असतात आणि एकामागून एक येतात. या कॅलेंडर नुसार वर्षाला 354 दिवस येतात. त्यामुळे ते सौर संवत वर्षापेक्षा 11 दिवसाने कमी असतात. हे अंतर कापण्यासाठी 30 वर्षानंतर जिलहिज्ज महिन्यात काही दिवस जोडले जातात. इस्लाममध्ये शुक्ल पक्षात चंद्र दर्शन झाल्यानंतरच्या रात्रीपासून नवीन महिन्याला सुरवात होते. याचा अर्थ इस्लाममध्ये महिने केवळ चांद्र आहेत. या महिन्यातील दिवसांना पहिला चंद्र, दुसरा चंद्र अशी नवे आहेत.
हिजरी सनाची सुरुवात
हिजरी सनाची सुरुवात दुसरे खलिफा हजरत उमर फारुख रजि. यांच्या काळात झाली. हजरत अली रजि. यांच्या सल्ल्यानंतरच त्याची सुरुवात झाली होती. इस्लामचे शेवटचे प्रवर्तक हजरत मोहम्मद हे पवित्र शहर मक्काहून मदीनाला गेले होते. त्यावेळेपासून हिजरी सनाला इस्लामी वर्षाचा आरंभ मानलं जात आहे. त्यानंतर हजरत अली रजि आणि हजरत उस्मान गनी रजि. यांच्या सल्ल्यानंतर खलिफा हजरत उमर रजि. यांनी मोहरमला हिजरी सनाच पहिला महिना म्हणून जाहीर केलं. त्यानंतर जगभरातील मुस्लिम लोक मोहर्रमला इस्लामी नवीन वर्षाचा पहिला महिना मानतात.
सूर्य मावळल्यानंतर दिवसाची गणना
इस्लामिक कॅलेंडरमधील पहिला महिना म्हणजे मोहरम. इस्लाम कॅलेंडरनुसार सूर्य मावळल्यावरच दिवसाची गणना केली जाते. कुराणच्या पॅरा नंबर दहामध्ये त्याबाबतची सविस्तर माहिती आहे. या दहाव्या पॅऱ्यातील सूरह तोबाच्या आयत नंबर 36नुसार, या पवित्र महिन्यातच हजरत आदम अलेहि सलाम प्रकटले. हजरत नूह अलेहि सलाम यांची वादळात डगमगणारी नाव किनाऱ्यावर आली. हजरत मूसा अलेहि सलाम आणि त्यांच्या समुदायाला फिरऔनमधील लष्कराकडून मदत मिळाली. त्यानंतर फिरऔन सागरात गडप झाले.
इस्लामिक कॅलेंडरचे 12 महिने
1. मोहरम 2.सफर 3.रबीउल-अव्वल 4. रबीउल-आखिर 5. जुमादिल-अव्वल 6. जुमादिल-आखिर 7. रज्जब 8. शाअबान 9. रमज़ान 10. शव्वाल 11. जिल काअदह 12. जिल हिज्जा
जुमादिल आखिरचं महत्त्वं काय?
हा महिना हिवाळ्यात सुरू होतो. इस्लामच्या कॅलेंडर नुसार पहिला महिना मोहरम असला तरी इंग्रजी कॅलेंडरनुसार जानेवारीत येणारा महिना म्हणजे जुमादिल आखिर आहे. तसेच इस्लामच्या कॅलेंडरमधील हा सहावा महिना आहे. या महिन्याचं नाव का पडलं त्याचंही एक कारण आहे. या महिन्याच्या आधी जमादिल अव्वल हा महिना येतो. या महिन्यात अरब देशात पाणी जमा झालं होतं. त्यामुळे थंडी पडली होती. म्हणून या महिन्याला जमादिल अव्वल असं नाव दिलं. त्यानंतरच्या महिन्यातही थंडी कायम राहिल्याने दुसऱ्या महिन्याला जमादिल आखिर हे नाव दिलं गेलं. तसेच अरब देशातील थंडीचा हा शेवटचा महिना असल्याने त्याला जमादिल आखिर म्हटल्या गेल्याचंही मुस्लिम विचारवंतांचं म्हणणं आहे.
महिना सुरू झाला कसे समजते?
इस्लामच्या कॅलेंडरनुसार जुमादिल आखिर हा सहावा महिना आहे. आकाशाच चंद्रदर्शन झाल्यानंतर शिया आणि सुन्नी उलेमांकडून चांद्र दर्शनाची घोषणा होते. शुक्रवारी चंद्र दर्शन झाल्यावर शनिवारी चांद (महिना) पहिली तारीख जाहीर केली जाते. तेव्हापासून हा मासारंभ सुरू होतो.
महिन्याचं अधिक महत्त्व काय?
जुमादिल आखिरला जमादिस्सानी चांदही म्हटलं जातं. तीन जमादिस्सानीच्या दिवशी हजरत फातिमा जहरा यांची शहादत झाली होती. याच महिन्याच्या 20 जमादिस्सानीला त्यांचा जन्म दिवसही साजरा केला जातो. याच महिन्यात हजरत जिबरील अलैह सलमा पहिल्यांदा रसूल अल्लाह यांना भेटले. 22 जमादिस्सानीला हजरत सिद्दीके अकबर यांच्या नंतर हजरत फारुके आजम यांना दुसरा खलिफा बनवलं गेलं.
Vastu | तुम्हीही कॉर्नरच्या घरात राहता? मग हे वास्तूदोष तुम्हाला माहीत असायलाच हवेत!https://t.co/ON5Vs5xSqB#vastutips | #Spiritual | #religious
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 4, 2022
संबंधित बातम्या:
Vastu | तुम्हीही कॉर्नरच्या घरात राहता? मग हे वास्तूदोष तुम्हाला माहीत असायलाच हवेत!
Astro Tips : सूर्यास्तानंतर या गोष्टी चुकूनही करु नका, नाहीतर आर्थिक नुकसान नक्की
Vastu Tips | घरात या 4 गोष्टी आहेत ? मग आत्ताच बाहेर काढा नाहीतर…