मासिक पाळी दरम्यान मंदीर आणि किचनमध्ये जाणं योग्य की अयोग्य? जया किशोरी यांचं स्पष्ट उत्तर
Jaya Kishori on Periods: मासिक पाळी दरम्यान मंदीर आणि किचनमध्ये जाणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या जया किशोरी काय म्हणाल्या..., जया किशोरी यांचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर होत असतात व्हायरल

जया किशोरी यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. जया किशोरी मोटिव्हेशनल स्पीकर आणि कथावाचक आहे. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जया किशोरी कायम त्यांच्या मुलाखतींमध्ये आणि पॉडकास्टमध्ये स्वतःचे स्पष्ट मत मांडताना दिसतात. त्यांचे विचार देखील अनेकांना आवडतात. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत जया किशोरी यांना मासिक पाळी दरम्यान किचन आणि मंदीरात जाण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर जया किशोरी यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.
जया किशोरी म्हणाल्या, ‘सुरुवात चांगली झाली पण मध्यल्या लोकांनी सर्व काही खराब केलं. मासिक पाळी दरम्यान या गोष्टीला हात लावू नका, त्या गोष्टीला हात लावू नका. असं करु शकत नाही, तसं करु शकत नाही. तुम्ही अपवित्र झाला आहात. कोणी मला फक्त कारण सांगा का अपवित्र? कसं अवित्र?’
‘कोणाकडेच कारण नाही… मी तर आजही प्रतीक्षा करते की कोणी मला कारण सांगेल. मला कोणी योग्य आणि पटणारं कारण सांगितल्यास मी आज या क्षणी माझे विचार आणि त्या गोष्टीकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोण बदलेल. मंदीरात पूजा पाठ करण्यासाठी नाही गेलं पाहिजे, पण त्याचं देखील कारण काय? स्पर्श करायचा नाही… असं काहीही नाही…
‘देवासाठी कोणीत अपवित्र नाही. येथे विषय देवाचा सुरु आहे. मनातून तुम्ही कोणत्याही स्थीतीत देवाचं नाव घेवू शकता. यामध्ये काहीही चुकीचं नाही. मासिक पाळी मागे कोणतंही धार्मिक कारण नाही. मासिक पाळी दरम्यान महिलांची प्रकृती खालावते. अशात त्यांना आरामाची अधिक गरज असते. त्यामुळे महिलांना आराम करण्याचा सल्ला दिला जातो.
जया किशोरी म्हणाल्या, ‘पूर्वीच्या व्यवस्था आज सारख्या नव्हत्या. म्हणून महिलांना बाहेर किंवा मंदीरात जाण्यास परवानगी नव्हती. व्यवस्था नसल्यामुळे महिलांसाठी काही नियम लागू करण्यात आले होते. पण मध्यल्या काळात सर्व नियमांना गालबोट लागला. जेव्हा भगवान श्रीकृष्णाने देवी द्रौपदीला तिच्या राजस्वला अवस्थेत स्पर्श केलं तेव्हा आपण याची कल्पना करू नये. आपण आपले विचार बदलले पाहिजे…’ असं देखील जया किशोरी म्हणाल्या.