पायात काळा धागा बाधणं खूप फायदेशीर! जाणूून घ्या फायदे
आजकालच्या काळात तरुण पिढीमध्ये काळ्या रंगाचा धागा फॅशन म्हणून बांधलेला आपल्याला दिसतो. पण ज्योतिषशास्त्रात त्याचे विशेष महत्व आहे.
हल्ली अनेकांच्या पायात काळात धागा बांधलेला दिसतो. काही लोक फॅशन म्हणून काळा धागा बांधतात. काळा रंग हा अशुभ मानला जातो. काळ्या रंगाच्या वस्तू किंवा कपडे खरेदी करणं ही अशुभ मानलं जातं. पण पायात काळा धागा बांधणं हे शुभ मानलं जातं. धार्मिक रित्या आणि ज्योतिष शास्त्रात या गोष्टीला खपू महत्व आहे. नजर लागू नये यासाठी वेगवेगळ्या गोष्टी लोक सांगतात. लोक फॉलो करतात. मीठ मोहरीने नजर काढली जाते, तर कधी मिर्ची ने नजर उतरवतात. नजर लागणे ही गोष्ट अनेक लोक फार गांभीर्याने घेतात. नजर लागू नये यासाठी वेगवेगळे उपाय करतात. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे पायामध्ये काळा धागा बांधणं. काही लोक फॅशन म्हणून पायात काळा धागा बांधतात. पण ज्योतिष शास्त्रात याला फार महत्व आहे. जाणून घेऊया पायामध्ये काळा धागा का बांधावा.
नकारत्मक आणि दृष्ट शक्ती लांब राहते
ज्योतिषशास्त्रानुसार काळा धागा बांधल्याने नकारात्मक आणि दृष्ट शक्ती लांब राहते. तसंच व्यक्तीचा अनेक प्रकारच्या वाईट नजरांपासून हा धागा रक्षण करतो. ज्यांना सारखी नजर लागते त्यांनी पायात काळा धागा बांधावाच.
कुंडलीतील दोष नाहीसे होण्यासाठी
कुंडलीत शनि दोष अशुभ स्थितीत असेल तर पायात काळा धागा बांधल्यान तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकते. त्याने आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवरील शनिचा नकारात्मक परिणाम नियंत्रणात तर येईलच व पूर्णपणे टाळता देखील येईल. नाहीतर शनीची अशुभ स्थिती खूप वाईट परिणाम करते.
आर्थिक नुकसान टाळण्यासाठी
तुम्हाला कोणाची नजर लागली असेल किंवा तुमचे आर्थिक नुकसान वारंवार होत असेल. तरा तुम्ही पायात काळा धागा बांधलाच पाहिजे. अशा लोकांनी पाया काळा धागा बांधल्याने खूप फायदेशीर ठरू शकते.
कुंडलीत ग्रहदोष असेल
तुमच्या कुंडलीत ग्रहदोष असतील. कुंडली राहू- केतू कमजोर स्थानी असतील तर पायात काळा धागा बांधणं गरजेचं आहे. तुमचं अनेक प्रकारच्या संकटापासून रक्षण होऊ शकते. राहू आणि केतू हे शनी महाराजां पेक्षा कडक ग्रह आहेत. अशावेळी जर आपले ग्रहस्थान प्रबळ नसेल तर ते शांत राहण्यासाठी अवश्यक गोष्टी कराव्यात.
नजर लावणाऱ्या व्यक्तिची नजर लागत नाही
काळा धागा बांधल्याने तुम्हाला नजर लागत नाही. एखादी व्यक्ती एकाग्र नजरेने तुम्हाल पाहत असेल तर. या पायत काळा धागा बांधल्याने व्यक्तिची एकाग्रता भंग होते. त्याने नकारत्मक ऊर्जा तुम्हाला प्रभावित करू शकत नाह.
धनलाभासाठी
काळा धागा बांधल्यामुळे धनलाभ होतो असा दावा ज्योतिषशास्त्रात अनेकजण करतात. तुम्ही तुमच्या डाव्या पायात मंगळवारी किंवा शनिवारी काळा धागा बांधल्यास धनलाभ होतो. तसेच तुमच्या जीवनातील पैशांसंबंधीची समस्या दूर होतात. शनी दोषापासून वाचण्यासाठी देखील काळा धागा उपयोगी ठरतो. काही लोकं फॅशन म्हणून तर काही लोकं नकारात्मक आणि दृष्ट शक्तीपासून बचाव करण्यासाठी काळ्या रंगाच्या धाग्याचा उपयोग करतात.