Janaki Jayanti 2021 | राजा जनक नाही, रावणाची पुत्री होती माता सीता! वाचा काय सांगतं अद्भुत रामायण…

राजा जनक यांना मूलबाळ नव्हते, म्हणून त्यांनी त्या मुलीला आपली मुलगी म्हणून स्वीकारले आणि तिचे नाव सीता ठेवले. या घटनेवरून हे स्पष्ट झाले आहे की, राजा जनक हे सीतेचे खरे पिता नव्हते.

Janaki Jayanti 2021 | राजा जनक नाही, रावणाची पुत्री होती माता सीता! वाचा काय सांगतं अद्भुत रामायण...
अद्भुत रामायणातील कथा!
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 8:52 AM

मुंबई : पौराणिक कथेनुसार सीता माता ‘मिथिला’ नरेश राजा जनक यांची कन्या होती. एकदा राजा जनकच्या राज्यात दुष्काळ पडला तेव्हा ऋषीमुनींच्या सल्ल्याने त्यांनी नांगर हातात धरुन स्वत: शेताची नांगरणी केली, जेणेकरून इंद्रदेव त्यांच्यावर प्रसन्न होतील आणि लवकरात लवकर त्यांच्या राज्यात पाऊस पडेल. यावेळी राजाचा नांगर एका धातूच्या वस्तूला धडकला आणि तो तिथेच अडकला. त्या ठिकाणी, राजा जनकला एक कलश प्राप्त झाला, ज्यामध्ये एक हसतमुख सुंदर चिमुकली मुलगी होती (Janaki Jayanti 2021 special mata sita birth story as mention in Adbhut Ramayana).

राजा जनक यांना मूलबाळ नव्हते, म्हणून त्यांनी त्या मुलीला आपली मुलगी म्हणून स्वीकारले आणि तिचे नाव सीता ठेवले. या घटनेवरून हे स्पष्ट झाले आहे की, राजा जनक हे सीतेचे खरे पिता नव्हते. आता प्रश्न पडतो की, माता सीता त्या कलशापर्यंत कशी पोहचली, तिचे खरे वडील कोण होते? उत्तर रामायण आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलेल्या कथांमध्ये याचे उत्तर आढळते. यंदा 6 मार्चला ‘जानकी जयंती’ अर्थात माता सीतेचा प्रकट दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने अद्भुत रामायणाची ही कथा जाणून घेऊया…

अद्भुत रामायणाची कथा!

अद्भुत रामायणानुसार, जेव्हा लंकापती रावण त्रेतायुगातील तीन जगाच्या स्वामित्वासाठी ध्यान करत होते, तेव्हा त्यांच्या तपस्येमुळे निर्माण झालेल्या सामर्थ्यामुळे संपूर्ण जग पेटू लागले होते. या गोष्टींशी संबंधित, सर्व देवता मदतीसाठी ब्रह्माकडे पोचले आणि हे जग वाचवण्याकरिता प्रार्थना केली.

मग, ब्रह्माजी रावणाजवळ गेले आणि त्यास वर मागण्यास सांगितले. रावण म्हणाला, ‘मला अमर असण्याचे वरदान द्या’. मात्र, ब्रह्माजींनी अमरत्वाचे वरदान देण्यास असमर्थता व्यक्त केली. यानंतर रावण म्हणाला की, ‘मला असे वरदान द्या म्हणजे मला, सूर, असुर, पिशाच्च, साप, किन्नर किंवा अप्सरा कोणीही मारू शकणार नाही.’

पुढे रावण म्हणाला, ‘जेव्हा मी अज्ञानाने माझ्या स्वत:च्या मुलीलाच मोहित होईन, तेव्हाच मला मृत्यू येऊ दे.’ रावणाला हे वरदान दिल्यानंतर ब्रह्माजी ब्रह्मलोकाकडे गेले. रावणाने आपल्याला मनुष्याच्या हातून मृत्यू येऊ नये असे वरदान मागितले नाही. कारण, तो मनुष्याला कमजोर समजत होता (Janaki Jayanti 2021 special mata sita birth story as mention in Adbhut Ramayana).

रावणाला सामर्थ्याचा गर्व

ब्रह्माजींकडून वरदान मिळाल्यानंतर रावण स्वत:ला सर्वशक्तिमान समजू लागला. एक दिवस तो दंडकारण्याला गेला. तेथे ऋषी-भिक्षू राहायचे. रावणाला त्या मुनींना मारणे योग्य वाटले नाही. तो म्हणाले, हे ऋषीमुनी! मी तुम्हाला जिंकण्याची इच्छा व्यक्त करतो.’ यानंतर, रावणाच्या सैनिकांनी आश्रमातून कमंडलू घेतले आणि एक बाण मारून ऋषींच्या शरीरातून रक्त काढले, हे रक्त त्या कमंडलूमध्ये टाकले आणि रावणाच्या स्वाधीन केले.

तो कमंडलू गत्समद ऋषींचा होता, जे शंभर पुत्रांचे पिता होते. त्यांना आपल्याला एका मुलगी असावी अशी तीव्र इच्छा होती. देवी लक्ष्मीकडे त्यांनी आपल्या घरी मुलगी व्हावी, म्हणून प्रार्थना केली होती. पुत्रीप्राप्तीसाठी अभिमंत्रित केलेले दूध ऋषींनी त्या कमंडलूमध्ये ठेवले होते. याचा कलशात रावणाने ऋषीमुनींचे रक्त भरले.

हे कमंडलू घेऊन रावण लंकेच्या दिशेने गेला. लंकेला पोहचल्यावर त्यांनी पत्नी मंदोदरीला कमंडलू दिले आणि सांगितले की, या कमंडलूमध्ये विषारी रक्त भरले आहे. तेव्हा त्याची काळजी घ्या.

वाढू लागलेली रावणाची दहशत

यानंतर, रावणाची दहशत सतत वाढू लागली. त्याने राक्षस, यक्ष, गंधर्व मुलींचे अपहरण केले आणि मंदारचल, हिमवान आणि मेरुच्या जंगलात राहायला गेला. मंदोदरीला हे सर्व आवडले नाही आणि एक दिवस तिने असे जीवन त्यागून देण्याच्या विचाराने कमंडलूमध्ये ठेवलेले विषारी रक्त प्यावे, असा निर्धार केला (Janaki Jayanti 2021 special mata sita birth story as mention in Adbhut Ramayana).

त्या कमंडलूतील अभिमंत्रित दुधाच्या सेवनामुळे मंदोदरीची गर्भधारणा झाली. त्यावेळी लंकापती रावण अनेक वर्ष तिथे नव्हता. अशा परिस्थितीत राणी मंदोदरीला वाटले की, जर तिला मूल झाले, तर राजवाड्यातील स्त्रिया तिच्या चारित्र्याबद्दल वाईटसाईट बोलतील. या भीतीने मंदोदरी यात्रेबद्दल खोटे सांगून विमानाने कुरुक्षेत्रात आली. तेथेच तिने एका मुलीला जन्म दिला आणि तिला कलशात ठेवून जमिनीत पुरले.

राणी मंदोदरी माता सीतेची आई!

काही काळानंतर, नांगरणी दरम्यान राजा जनकाला तो कलश सापडला. रावणाला सीता आपली मुलगी आहे, याची कल्पना नसल्यामुळे, तो अज्ञानाने स्वतःच्या मुलीवर अर्थात सीतेवर मोहित झाला आणि त्याच्या याच चुकीमुळे त्याचा मृत्यू झाला. माता सीतेचा पती अर्थात भगवान श्रीराम मानवी रूपात जन्मले आणि त्यांनी रावणाचा वध केला. त्यामुळे माता सीतेची आई मंदोदरी होती, हे या अद्भुत रामायणाच्या कथेवरून हे स्पष्ट झाले आहे. मंदोदरीचे पती असल्याने लंकापती रावण सीतेचा पिता झाले. तथापि, सीतेचे वडील गत्समद ऋषी असल्याचा काही लोकांचा विश्वास आहे, कारण अभिमंत्रित करून त्यांनी ते दूध कमंडलूत ठेवले होते.

सदर माहिती ही अद्भुत रामायणावर आधारित असून, याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही.

(Janaki Jayanti 2021 special mata sita birth story as mention in Adbhut Ramayana)

हेही वाचा :

Janaki Jayanti 2021 | माता सीतेचा प्रकट दिन अर्थात ‘जानकी जयंती’, घरातील कन्येच्या विवाहासाठी करा ‘हे’ उपाय!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.