जया किशोरी यांचं वक्तव्य, ‘रावण रेपिस्ट होता, त्याने सीतेला स्पर्श केलं नाही कारण…’
Jaya Kishori: राम आणि रावण यांच्यावर जया किशोरी यांचं लक्षवेधी वक्तव्य, रावण रेपिस्ट असल्याचं सांगत म्हणाल्या, 'नाईलाज होता म्हणून त्याने सीतेला स्पर्श केलं नाही, कारण...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जया किशोरी यांची चर्चा...

Jaya Kishori: कथावाचक आणि मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी यांनी नुकताच एक लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहे. नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये जया किशोरी यांनी रावण रेपिस्ट असल्याचं सांगितलं आहे. अनेक मुली म्हणतात, मला रामासारखा नाही तर, रावणासारखा नवरा पाहिजे, कारण त्याने सीतेला स्पर्श देखील केलं नाही… यावर जया किशोरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जया किशोरी यांच्या वक्तव्याचं काहींना समर्थन केलं आहे. तर काहींनी मात्र विरोध केला आहे.
पॉडकास्टमध्ये जया किशोरी म्हणाल्या, ‘अनेक जण म्हणतात मला रामासारखं नाही तर रावणासारखं बनायचं आहे. कारण त्याने सीता यांना स्पर्श देखील केला नाही. बहिणीच्या अपमानाचा बदला घेता यावा म्हणून त्याने रामासोबत युद्ध देखील केलं. शिवाय रावणाने काधी परस्त्रीला हात देखील लावला नाही… असं म्हणतात. पण सर्वात आधी तुम्ही तुमचं वाचन वाढवा.’
‘रावण रेपिस्ट होता. त्याने एका अप्सरेवर बलात्कार केलेला. त्या प्रसंगानंतर अप्सरा ब्रह्मदेवाकडे गेली तिने तिची व्यथा सांगितली. तेव्हा ब्रह्मदेवाने रावणारा शाप दिला. जर रावण कोणत्या स्त्रीला तिच्या इच्छेविरूद्ध स्पर्श करेल त्याचे 100 तुकडे होतील. म्हणून नाईलाज होता म्हणून त्याने सीतेला स्पर्श केलं नाही.’ असं जया किशोरी म्हणाला.
एवढंच काही तर, जया किशोरी यांनी त्या अप्सरेची कथा देखील सांगितली, पुराणातील कथेनुसार रावण कुबेराच्या घरासमोरुन जात असताना त्याने रंभा नावाच्या एका अप्सरेला पाहिले. तिचे सौंदर्य पाहून रावण मोहीत झाला आणि तू माझ्यासोबत लंकेला चल… असं म्हणू लागला. तेव्हा त्या रंभेने रावणाला सांगितलं, मी कुबेराची सून आहे. म्हणजे मी तुझी देखील सून आहे. तरी देखील रावणाने अप्सरेवर बळजबरी केली. त्यानंतर रंभा ब्रह्मदेवाकडे गेली आणि सर्वकाही त्यांना सांगितलं. त्यानंतर ब्रह्मदेवांना रावणाला शाप दिला… असं जया किशोरी यांनी पॉडकास्ट मध्ये सांगितलं आहे.
जया किशोरी यांच्या वक्तव्याचं काहींनी समर्थन केलं आहे. तर काहींनी मात्र आक्षेप घेतला आहे. काही मुलींनी कमेंट त्यांच्या व्हिडीओ कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. मुलींना राम नाही रावणासारखा पती पाहिजे. कारण त्याने कधी दुसऱ्या महिलेला स्पर्श केला नाही. सध्या सर्वत्र जया किशोरी यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.