Jyeshtha Gauri Puja 2022: आज ज्येष्ठा गौरी आवाहन, मुहूर्त आणि महत्त्व

भाद्रपद महिन्यात शुक्ल अष्टमीला महालक्ष्मी पूजन केले जाते. महालक्षमींचं आगमण गणेश चतुर्थीच्या चार दिवसांनी होतो. राज्यात गौरी गणपतीचा सण साजरा करण्याच्या प्रथा वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत. 

Jyeshtha Gauri Puja 2022: आज ज्येष्ठा गौरी आवाहन, मुहूर्त आणि महत्त्व
महालक्ष्मी पूजा Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 8:54 AM

Jyeshtha Gauri Puja 2022 : 31 ऑगस्टला बुधवारी घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झाले. यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा होत असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. आज जेष्ठा गौरी आवाहन (Jyeshtha Gaouri Aawahan) आहे. कोल्हापूर वासिनी महालक्ष्मी माता (Mahalakshmi 2022)  मुलाबाळांसह तीन दिवसांसाठी माहेरी येतात. आज महालक्ष्मीची स्थापना, उद्या महापूजा आणि परवा विसर्जन असा तीन दिवसांचा उत्सव साजरा केला जाणार आहे. भाद्रपद महिन्यात शुक्ल अष्टमीला महालक्ष्मी पूजन केले जाते. महालक्षमींचं आगमण गणेश चतुर्थीच्या चार दिवसांनी होतो. राज्यात गौरी गणपतीचा सण साजरा करण्याच्या प्रथा वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत.  हा सण साजरा करण्यामागी आख्यायिका आणि मान्यता देखील वेगवेगळ्या आहेत. काही मान्यतांनुसार गौरीला श्री गणेशाची बहीण मानले जाते, तर प्रचलित दंतकथांनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे आणि ती श्री गणेशाची माता आहे. काही लोक या सणाला महालक्ष्मी पूजा देखील म्हणतात आणि या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा अर्चना करतात.

 तिथी आणि मुहूर्त

  1. ज्येष्ठा गौरी आवाहन तिथी : 3 सप्टेंबर 2022, शनिवार
  2. ज्येष्ठा गौरी आवाहन मुहूर्त : 3 सप्टेंबर 2022, शनिवारी रात्री 10:56 पर्यंत
  3. ज्येष्ठा गौरी पूजन तिथी : 4 सप्टेंबर 2022, रविवार
  4. ज्येष्ठा गौरी पूजन मुहूर्त : सकाळी 06:00 ते संध्याकाळी 06:39 पर्यंत
  5. हे सुद्धा वाचा
  6. ज्येष्ठा गौरी पूजन कालावधी: 12 तास 39 मिनिटे
  7. ज्येष्ठा गौरी विसर्जन तिथी : 5 सप्टेंबर 2022, सोमवार
  8. ज्येष्ठा गौरी विसर्जन मुहूर्त : सकाळी 06:01 ते 06:38 पर्यंत
  9. ज्येष्ठा गौरी विसर्जन कालावधी: 12 तास 37 मिनिटे

असा साजरा होतो उत्सव

भाद्रपदात शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर जेष्ठा गौरीचे आगमन होते.  त्या नक्षत्रावर तिची पूजा करतात आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन करण्याची पद्धत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात ज्येष्ठा गौरीच्या आवाहनाच्या वेळी दोन गौरी बसवण्याची प्रथा आहे. त्यामधील एक गौरी घरातच असते, तीच लक्ष्मी होय. एक गौरी बाहेरून आणली जाते, तीच ज्येष्ठागौरी होय. पण ती घरात येताना रांगोळीने आठ पावले काढून त्यावरील प्रत्येक पावलावर ती थोडी थांबवू तिच्या विविध प्रकारांचा उल्लेख होतो. त्यात आद्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, सौभाग्यलक्ष्मी, अमृतलक्ष्मी, कामलक्ष्मी, सत्यलक्ष्मी, भोगलक्ष्मी व योगलक्ष्मी अशा अष्टलक्ष्मींचा समावेडा होतो. या आठ पावलांवर स्त्रिया आपल्या गरजेनुसार गाईवासरे, धनधान्य, अलंकार, पुत्रपौत्र, दीर्घायुष्य, व्यवसायातील प्रगती आदि कामनांचा उल्लेख करतात. महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबात शेकडो वर्षांपासून हा सण अखंडपणे साजरा होत आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?.
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?.
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?.
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.