नव्या घरात जाण्यापूर्वी या 8 गोष्टी लक्षात ठेवा; 7 वी गोष्ट महत्त्वाची

घर घेणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर लगेच त्या घरात राहायला जाण्याची इच्छा होते. पण नवीन घरात जाण्यासाठी काही नियम सांगितले आहे. नवीन घरात या नियमानुसार प्रवेश केला नाही तर नकारात्मक ऊर्जा तिथे वास करते. एवढेच नाही तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात. यामुळे घरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात. त्यामुळे नवीन घरात प्रवेश करताना काही नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

नव्या घरात जाण्यापूर्वी या 8 गोष्टी लक्षात ठेवा; 7 वी गोष्ट महत्त्वाची
Home Pooja Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 11:35 AM

स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते. घर हे जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ज्योतिष शास्त्र सांगते की नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी पूजा करणे आवश्यक आहे. नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी केलेली पूजा अत्यंत शुभ मानली जाते. पूजा केल्या शिवाय नवीन घरात राहू नये असे शास्त्रात सांगितले आहे.

हिंदू धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे घरात राहायला जाण्यापूर्वी केलेल्या पूजेला गृहप्रवेश पूजा म्हणतात. घरातील वाईट आणि नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी ही पूजा केली जाते. ज्योतिष शास्त्र सांगते की घरात प्रवेश करण्याच्या तीन पद्धती आहेत. यामध्ये अपूर्व गृहप्रवेशाचा समावेश आहे म्हणजे नवीन घरात प्रवेश करणे. वास्तुशास्त्रामध्ये नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवायला सांगितले आहे. नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवल्या नाही तर आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित समस्यांशिवाय इतरही अनेक नुकसान होऊ शकतात.

गृहप्रवेश करताना घ्या या गोष्टींची काळजी

1. नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी महिना, तिथी आणि शुभ दिवस पाहणे अत्यंत आवश्यक आहे.

2. नवीन घरात प्रवेश करताना विघ्नहर्ता गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. याशिवाय वास्तुपूजनालाही महत्त्व आहे.

3. नवीन घरात गृहप्रवेश करताना नेहमी उजवा पाय प्रथम ठेवावा. पूजा झाल्यानंतर सर्व सदस्यांनी रात्री तिथेच झोपावे.

4. घराची पूजा केल्यानंतर घरातील मुख्य सदस्याने संपूर्ण घराला फेरा मारला पाहिजे.

5. घरातील स्त्रीने पाण्याने भरलेला कलश घेऊन संपूर्ण घराला एक चक्कर मारा तसेच घरामध्ये सर्वत्र फुले टाका.

6. पूजेच्या दिवशी पाण्याने किंवा दुधाने भरलेला कलश घरात ठेवा. त्यानंतर तो कलश दुसऱ्या दिवशी कोणत्याही मंदिरात अर्पण करा.

7. गृहप्रवेशाच्या दिवशी दूध उकळणे महत्त्वाचे असते असे करणे अत्यंत शुभ मानले जाते.

8. गृहप्रवेश केल्याच्या नंतर ते घर चाळीस दिवस सोडू नये असे सांगितले जाते. त्या घरात किमान एक सदस्य 40 दिवस राहिला पाहिजे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.