Dev Diwali 2021: लग्न जमत नाही?, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवाय?, मग देव दिवाळीच्या दिवशी 5 उपाय नक्की करा
दिवाळी प्रमाणेच कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणारा देव दिवाळी हा देखील पवित्र सण आहे. हा सण सुख, समृद्धी आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा आहे.

मुंबई : कार्तिक महिन्यातील अमावास्येनंतर देव दीपावली हा पवित्र सण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.या दिवशी देवता दिवाळी साजरी करण्यासाठी भुलोकात येतात अशी मान्याता आहे. देव दीपावलीच्या दिवशी नदीच्या तीर्थावर दिवा लावण्याचे खूप महत्त्व आहे. यामुळेच लोक वाराणसीतील गंगेच्या काठावर पुण्यप्राप्तीसाठी दिवा लावतात. देव दीपावलीच्या दिवशी गंगेत स्नान करून दिवे दान केल्याने सुख-समृद्धीसह दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. पण प्रत्येकालाच ही गोष्ट जमेलच असे नाही त्यामुळे या दिवसामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी करुन पूर्ण प्रप्त करु शकता चला तर मग जाणून घेऊयात
दिव्यांचे दान
देव दीपावलीच्या दिवशी गंगास्नान, दीपदान आणि दानाचे महत्त्व आहे. अशा स्थितीत शक्य असल्यास गंगास्नान किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे आणि नंतर पूर्ण भक्तीभावाने आपल्या देवतेचे ध्यान करत दिव्यांचे दान करावे.
सत्यनारायणाची कथा ऐका
कार्तिक महिन्यात, जेव्हा दीपावली साजरी केली जाते, तेव्हा भगवान विष्णू योगनिद्रामध्ये असतात, म्हणून त्या वेळी देवी लक्ष्मीची पूजा गणपती सोबत केली जाते. यानंतर, जेव्हा भगवान विष्णू योग निद्रातून जागे होतात, तेव्हा दीपावलीच्या दिवशी सर्व देवी-देवता माता लक्ष्मीसह भगवान श्री विष्णूची विशेष साधना-पूजा करतात. भगवान विष्णूंसोबत लक्ष्मीची पूजा करण्याचा दिवस अतिशय शुभ आहे. या दिवशी तुम्ही भगवान सत्यनारायणाची कथा ऐकू शकता.
तुळशी मातेची पूजा
देव दीपावलीच्या दिवशी भगवान शालिग्राम आणि तुळशी मातेची पूजा केल्याने खूप पुण्य प्राप्त होते. असे मानले जाते की देव दीपावलीच्या दिवशी माता तुळशी आणि शालिग्राम देवाची पूजा केल्याने विवाहात येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनसाथी लवकर मिळतो.
शंख अर्पण
देव दीपावलीच्या दिवशी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी, विशेषत: भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करा आणि त्यांना 11 हळदीने भरलेले शंख अर्पण करा. त्यानंतर दुसर्या दिवशी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून या पुजलेल्या शंखाना आपल्या धनस्थानावर ठेवा. हा उपाय केल्याने तुमचे घर वर्षभर धन-धान्याने भरलेले राहील.
आंब्याच्या पानांचे तोरण
देव दीपावलीच्या दिवशी घरामध्ये आंब्याच्या पानांचे तोरण बनवा आणि घराच्या मुख्य दारात लावा आणि घरभर गंगाजल आणि हळदीचे पाणी शिंपडा. हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि सुख आणि सौभाग्य वाढेल.
इतर बातम्या :
अकाली मृत्यूला घाबरताय? ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा, जाणून घ्या 6 आश्चर्यकारक फायदे
Chandra Grahan 2021 | दिवाळीनंतर वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण, कधी आणि कुठे दिसणार, जाणून घ्या