ऐन दिवाळीत सूर्यग्रहण; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार खूपच अडचणी आणि…
ग्रहणाच्या खगोलीय घटनेला ज्योतिष शास्त्रानुसार देखील विशेष महत्व असतं.
नवी दिल्ली : ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. यामुळे खगोलप्रेमी या घडामोडीकडे लक्ष ठेवून असतात. मात्र, ग्रहणाच्या खगोलीय घटनेला ज्योतिष शास्त्रानुसार देखील विशेष महत्व असतं. 2022 सालातील शेवटचे सूर्यग्रहण दिवाळीत होणार आहे. 25 ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी सूर्यग्रहण होणार आहे. ग्रहण घडणे ही ज्योतिषशास्त्रीय आणि खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते.
ग्रहणच्या आधल्या दिवशीम्हणजेच 24 ऑक्टोबरला दिवाळी सणाचा शुभारंभ होणार आहे. यामुळे ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाईल.
अनेक वर्षांनंतर असा दुर्मिळ योगायोग आला आहे. सूर्यग्रहणाच्या दिवशी दीपावली आणि दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही आणि सणांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. परंतु, ग्रहणाचे शुभ आणि अशुभ प्रभाव अनेक राशींवर पहायला मिळतात.
ज्योतिष शास्त्रानुसार या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण काही राशींसाठी अडचणी निर्माण करणारे असल्याचे ज्योतीष तज्ञांचे म्हणणे आहे. काही ठराविक राशीच्या लोकांनी ग्रहण काळात खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
भारतीय वेळेनुसार, मंगळवार 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 04:23 पासून सूर्यग्रहण सुरू होणार आहे. सायंकाळी 06:25 पर्यंत हे ग्रहण राहील. ग्रहणाची मध्य वेळ 05:28 वाजता असेल आणि मोक्ष 06:25 वाजता होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचे सुतककाळ पाळणे गरजेची नाही.
सूर्यग्रहणामुळे‘या’ राशीच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात
वृषभ – सूर्यग्रहण वृषभ राशीच्या लोकांच्या अडचणी वाढवू शकते. या राशीच्या लोकांनी ग्रहण काळात आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. धनहानी होण्याचीही शक्यता आहे. ग्रहण काळात कोणत्याही प्रकारचे व्यवहार आणि गुंतवणूक करणे टाळा.
मिथुन – वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण मिथुन राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरु शकते. अनावश्यक खर्च टाळावा. अनावश्यक खर्च झाल्यास आर्थिक संकट निर्माण होवू शकते. तुमच्या जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात.
तूळ – तूळ राशीतील लोक शनीच्या साडेसातीतून जात आहेत. यामुळे हे शेवटचं सूर्यग्रहणामुळे या राशीच्या लोकांसाठी नव्या अडचणी निर्माण करणारे ठरू शकते. या ग्रहणाचा परिणाम तूळ राशीच्या लोकांच्या मानसिक स्वास्थावर होणार आहे. या काळात मन अस्वस्थ आणि भयभीत राहू शकते. यामुळे अशा वेळेस शांत रहावे.
कन्या – कन्या राशीच्या लोकांसाठी देखील सूर्यग्रहण अशुभ मानले जात आहे. आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. उत्पन्नात घट होऊ शकते. आर्थिक संकट टाळण्यासाठी या काळात कोणतेही नवीन काम सुरू करु नका.