Lohri 2023: 13 की 14 किती तारखेला साजरी होणार लोहरी? काय आहे या सणाचे महत्व?
पंजाब आणि हरियाणामध्ये हा उत्सव खूप लोकप्रिय आहे. पंजाबमध्ये लोहरी कापणीच्या वेळी साजरी केली जाते. असे मानले जाते की या सणानंतर पीक कापणी केल्याने..
मुंबई, लोहरी हा सण आनंदाचे प्रतिक मानला जातो. हा सण शेतकऱ्यांचे नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. यावेळी लोहरी (Lohri 2023) 13 जानेवारीला नाही तर 14 जानेवारी 2023 रोजी म्हणजेच शनिवारी साजरी केली जाणार आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये हा उत्सव खूप लोकप्रिय आहे. लोहरीच्या दिवशी शेंगदाणे, तीळ, गूळ, गजक, रेवडी अग्नीत अर्पण करण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी लोहरीला तिलोडी (Tilodi) असेही म्हणतात. लोहरीचा हा विशेष सण पिकांना समर्पित असतो. पंजाबमध्ये लोहरी कापणीच्या वेळी साजरी केली जाते.
काय आहे लोहरी महत्व
पंजाबमध्ये लोहरी कापणीच्या वेळी साजरी केली जाते. असे मानले जाते की या सणानंतर पीक कापणी केल्याने उत्पन्न वाढते आणि घरात आनंद येतो. लोहरीच्या दिवशी लोकं होळी प्रमाणे अग्नी प्रज्वलीत करतात आणि त्यात गूळ, तीळ, रेवडी, गजक इत्यादी टाकतात. यानंतर ते या सर्व गोष्टी एकमेकांसोबत शेअरही करतात. या दिवशी रब्बी पीक अग्नीला अर्पण करून सूर्यदेव आणि अग्नी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी शेतकरी चांगल्या पिकाची कामना करतात.
लोहरी 2023 शुभ मुहूर्त
हिंदू कॅलेंडरनुसार, लोहरी 14 जानेवारी 2023 रोजी म्हणजेच शनिवारी साजरी केली जाईल. लोहरी पूजेसाठी 08:57 ही वेळ शुभ राहील.
लोहरी 2023 पूजन विधी
या शुभ दिवशी स्वच्छ मोकळ्या जागेत लाकडाचा ढीग आणि वाळलेल्या शेणाच्या गाैऱ्या ठेवून आग लावावी. अर्घ्य दिल्यानंतर त्यामध्ये रेवडी, सुका मेवा, शेंगदाणे, गजक अर्पण करा. या पवित्र अग्निची 7 परिक्रमा करा. प्रदक्षिणा करताना रेवडी, शेंगदाणे, तीळ इत्यादींचा नैवेद्य ठेवावा. प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या.
या दिवशी बालोत्सवादरम्यान मुले घरोघरी लोकंगीते गातात आणि त्यांना लोकांकडून मिठाई आणि पैसेही दिले जातात. या दिवशी मुलांना रिकाम्या हाताने पाठविल्या जात नाही, म्हणून त्यांना या दिवशी साखर, गजक, गूळ, शेंगदाणे आणि मका इत्यादी देखील दिले जाते, ज्याला लोहरी म्हणतात.