Lord Ganesh | आयुष्यात यश मिळवण्यासाठी श्रीगणेशाकडून हे 5 नक्की गुण शिका
गणेशाला विद्येचा देवता म्हणून देखील ओळखले जाते.भगवान गणेश हिंदू धर्मातील सर्वात पूज्य देवतांपैकी एक आहे. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते.
मुंबई : गणेशाला विद्येचा देवता म्हणून देखील ओळखले जाते.भगवान गणेश हिंदू धर्मातील सर्वात पूज्य देवतांपैकी एक आहे. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. भगवान गणेश आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
एक चांगला श्रोता व्हा भगवान गणेश नेहमी एक संदेश देतात की तुम्ही चांगले श्रोते व्हा. बोलण्यापेक्षा तुम्ही ऐकले पाहिजे. कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी चांगला श्रोता असणं खूप गरजेचं असतं, असं नेहमीच म्हटलं जातं. गणेशजींच्या हत्तीच्या कानातून हा संदेश घेता येतो की चांगला श्रोता असणे किती महत्त्वाचे आहे.
संतुलन ठेवा जीवनात समतोल राखणे खूप गरजेचे आहे. घर असो, काम असो किंवा मजा असो, खेळ आणि जीवन यात नेहमीच समतोल असायला हवा. जर तुम्ही गणेशमूर्ती नीट पाहिली असेल, तर तुम्ही पाहिले असेल की गणपतीचे एक पाय जमिनीवर विसावला आहे या वरुन आपल्याला जीवनातील संतुलनाचे महत्त्व शिकता येते.
सर्वांचा आदर करा भगवान गणेश आपल्याला नेहमीच सर्वांचा आदर करण्यास आणि प्रत्येकाशी नम्र राहण्यास शिकवतात. भगवान गणेश नेहमीच आपल्याला शिकवतात की कोणीही असमान नाही आणि प्रत्येकाशी तुम्हाला जशी वागणूक हवी आहे तशीच वागणूक दिली पाहिजे. गणेशजींचे वाहन उंदीर आपल्याला नम्र व्हायला आणि अगदी लहान प्राण्यांचाही आदर करायला शिकवते.
तुमचे ज्ञान आणि शक्ती हुशारीने वापरा तुमच्याकडे कितीही ज्ञान किंवा शक्ती असली तरी तुम्ही त्याचा चुकीच्या मार्गाने वापर टाळला पाहिजे. त्याऐवजी त्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी केला पाहिजे. तुमचे ज्ञान आणि शक्ती हे तुमचे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. त्यामुळे स्वतःचे किंवा इतरांचे नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही ते हुशारीने वापरावे.
तुमच्या दोषांचा स्वीकार करा कोणीही परिपूर्ण नसतो आणि प्रत्येकाचे स्वतःचे दोष असतात. या दोषांचा मनापासून स्वीकार करावा. तुम्ही तुमच्या दोषांना तुमची कमकुवतता मानू नका, जेव्हा तुम्ही दोषांना स्विकारलेत तर तुम्ही तेथेच अर्धी लढाई जिंकलेली असते.
(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
Chanakya Niti : ही 5 लक्षणं म्हणजे, आर्थिक संकटाची घंटा! आताच तपासून पाहा
तुमच्या घरात ही पेंटिंग आहेत तर आताच काढा नाहीतर…
Drawing Room Vastu | ड्रॉईंग रूममधील वस्तू योग्य दिशेला ठेवा , नाहीतर आर्थिकनुकसान नक्की