Shivlinga | शंकराच्या या चमत्कारी स्तोत्राचे पठण करा, प्रत्येक संकट दूर होईल

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुख-दुःखाचे चक्र निरंतर सुरुच असते. परंतु काहीवेळा संकटं इतकी जास्त असतात की व्यक्तीला परिस्थितीचा सामना करणे खूप कठीण होते. अशा परिस्थितीत शंकराचे हे अत्यंत चमत्कारिक आणि शक्तिशाली लिंगाष्टकम् स्तोत्र तुमची सर्व संकटं दूर करु शकते. शिवपुराणात शिवलिंगाच्या पूजेसाठी लिंगाष्टकम स्तोत्राचा उल्लेख केला आहे.

Shivlinga | शंकराच्या या चमत्कारी स्तोत्राचे पठण करा, प्रत्येक संकट दूर होईल
Shivlinga
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 7:41 AM

मुंबई : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुख-दुःखाचे चक्र निरंतर सुरुच असते. परंतु काहीवेळा संकटं इतकी जास्त असतात की व्यक्तीला परिस्थितीचा सामना करणे खूप कठीण होते. अशा परिस्थितीत शंकराचे हे अत्यंत चमत्कारिक आणि शक्तिशाली लिंगाष्टकम् स्तोत्र तुमची सर्व संकटं दूर करु शकते. शिवपुराणात शिवलिंगाच्या पूजेसाठी लिंगाष्टकम स्तोत्राचा उल्लेख केला आहे.

शिवलिंग हे भगवान शंकराचे साकार स्वरुप मानले जाते. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने दररोज शिवलिंगाला जल आणि बेलपत्र अर्पण करण्यासोबत या महाशक्तिशाली लिंगाष्टकम् स्तोत्राचे पठण केले तर कितीही कठीण वेळ आली तरी त्याला प्रत्येक समस्येचे समाधान मिळते आणि तो काही वेळातच संकटांतून मुक्त होतो. असे मानले जाते की या स्तोत्राचे पठण केल्याने शिव खूप प्रसन्न होतात आणि विशेष आशीर्वाद देतात. देवताही या स्तोत्राने शिवाची स्तुती करतात. जर तुमच्या जीवनात असे संकट येत असतील. ज्यावर तुम्ही प्रयत्न करुनही मात करु शकत नसाल, तर शंकराच्या आश्रयाला जा आणि या स्तोत्राचा पठण करा. आठ श्लोक असलेले हे स्तोत्र तुमच्या सर्व अडचणी दूर करु शकते.

लिंगाष्टकम् स्तोत्र

1. ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गम्,

जन्मजदुःखविनाशकलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम्.

2. देवमुनिप्रवरार्चितलिङ्गं कामदहं करुणाकरलिङ्गम्,

रावणदर्पविनाशनलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम्.

3. सर्वसुगन्धिसुलेपितलिङ्गं बुद्धिविवर्धनकारणलिङ्गम्,

सिद्धसुरासुरवन्दितलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम्.

4. कनकमहामणिभूषितलिङ्गं फणिपतिवेष्टितशोभितलिङ्गम्,

दक्षसुयज्ञविनाशनलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम्.

5. कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गं पङ्कजहारसुशोभितलिङ्गम्,

सञ्चितपापविनाशनलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम्.

6. देवगणार्चितसेवितलिङ्गं भावैर्भक्तिभिरेव च लिङ्गम्,

दिनकरकोटिप्रभाकरलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम्.

7. अष्टदलोपरिवेष्टितलिङ्गं सर्वसमुद्भवकारणलिङ्गम्,

अष्टदरिद्रविनाशितलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम्.

8. सुरगुरुसुरवरपूजितलिङ्गं सुरवनपुष्पसदार्चितलिङ्गम्,

परात्परं परमात्मकलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम्.

लिङ्गाष्टकमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ

शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते

शिवलिंग हे शंकराचे साकार रुप आहे

शिवपुराणातील पौराणिक कथेनुसार, भगवान शंकराचे शिवलिंग रुप हे शाश्वत आणि अनंत मानले जाते. असे मानले जाते की भगवान शिव प्रथम विश्वात इतक्या मोठ्या शिवलिंगासह प्रकट झाले की ब्रह्मा आणि विष्णू देखील त्याचा उगम आणि शेवट शोधू शकले नाहीत. असे मानले जाते की प्रणव मंत्राचा जप त्याच अनंत शिवलिंगातून झाला होता, ज्यापासून संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती झाली आहे. यामुळेच शिवलिंगाची पूजा अनादिकाळापासून होत आहे. याचे पुरावे पुरातन सभ्यतांमधूनही समोर आले आहेत. शिवाचे अवतार मानले जाणारे शिवलिंग अत्यंत शक्तिशाली मानले जाते.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Spiritual Trees | हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जातात ही झाडं, जाणून घ्या कोणत्या झाडाचं काय महत्त्व?

Kartik Purnima 2021 | कार्तिक पौर्णिमा कधी आहे? काय आहे तीचे महत्त्व, जाणून घ्या इत्तंभूत माहिती

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.