Lucky Plants For Home | तुमच्या घरात आहे का ‘पैशाचं झाडं’ ? घरात ही पाच झाडं लावा, कधीही धन-धान्याची कमतरता भासणार नाही
'पैशाचं झाडं' (Money) ही संकल्पना तुम्ही खूप वेळा ऐकली असेल. पण खरंच असं घडलं तर ! झाडांचा हिरवागार (Green) सहवास कोणाला आवडणार नाही? झाडं आपल्या सभोवतालचे वातावरण स्वच्छ ठेवतात आणि मनाला शांती देतात. घरात झाडे लावल्याने ते घराच्या सौंदर्यात भर घालतात.
मुंबई : ‘पैशाचं झाडं’ (Money) ही संकल्पना तुम्ही खूप वेळा ऐकली असेल. पण खरंच असं घडलं तर ! झाडांचा हिरवागार (Green) सहवास कोणाला आवडणार नाही? झाडं आपल्या सभोवतालचे वातावरण स्वच्छ ठेवतात आणि मनाला शांती देतात. घरात झाडे लावल्याने ते घराच्या सौंदर्यात भर घालतात. म्हणूनच आजकाल अनेकजण अंगणातील बागेत, घरात, बाल्कनीत झाडे लावतात. पण तुम्हाला माहिती आहे काय की या झाडांचा सौभाग्य आणि दुर्दैवाशी संबंध आहे (Vastu Tips) वास्तुमध्ये काही वनस्पती फायदेशीर कल्याणकारी मानल्या जातात आणि त्या घरात लावल्याने ग्रह दोष आणि वास्तूदोष वगैरे दूर होतात. त्याचबरोबर काही झाडे घरात न लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कुठली झाडं तुमच्यासाठी लकी आहेत हे जाणून घेऊयात.
तुळस घराच्या पूर्वेकडील किंवा उत्तर-पूर्व दिशेने तुळशीची लागवड करावी. मान्यता आहे की जर तुळशी योग्य दिशेने लावली गेली तर ती घराचे वास्तू दोष दूर करते. शिवाय घराची नकारात्मकता देखील दूर होते. तुळशीपुढे नियमितपणे दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होतात आणि घरात धन-धान्याची कमतरता भासत नाही.
मनी प्लांट वास्तूशास्त्रानुसार अशी मान्यता आहे की ही वनस्पती जितक्या वेगाने पसरते, घरात अधिक संपत्ती आणि समृद्धी येते. ही घराच्या दक्षिण-पूर्व दिशेने ठेवली पाहिजे. यामुळे घरात सकारात्मकता येते आणि कुटुंब प्रमुखांच्या चिंता कमी होतात.
पारिजातक पारिजातकाचे झाड हे स्वर्गातील झाड म्हणून ओळखले जाते. त्याला कल्पवृक्ष असेही म्हणतात. त्याच्या फुलांचा सुगंध दूरदूरपर्यंत दरवळतो. मान्यता आहे की ज्या घरात ही वनस्पती वाढते तेथे सर्व देवतांचा आशीर्वाद राहातो. जर त्याचे फळ नियमितपणे देवाला अर्पित केले तर सोन्याचे दान केल्यासारखे पुण्य मिळते. घरात पैशांची कमतरता राहात नाही.
शमी घरात शमीचे झाड लावणे देखील शुभ आहे. ही वनस्पती लावण्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. ते शनिदेवशी संबंधित असल्याची मान्यता आहे. शनिदेव कोणालाही राजा किंवा रंक बनवू शकतात. म्हणूनच लोक घरात या वनस्पतीची लागणे टाळतात. परंतु जर हे झाड मुख्य दाराच्या डाव्या बाजूला लावले असेल आणि त्याखाली मोहरीच्या तेलाचा दिवा नियमितपणे लावला तर शनिदेव प्रसन्न होतात. असे केल्याने घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही आणि शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो.
आवळा आवळ्याचे झाडही खूप शुभ मानले जाते. हे देवांचे निवासस्थान असल्याचे मानले जाते. हे झाड नारायणांना खूप प्रिय आहे. मान्यता आहे की घरात हे झाड लावून नियमितपणे त्याखाली दिवा लावल्यास नारायण आणि देवी लक्ष्मी यांचे आशीर्वाद मिळतात आणि घरात पैशांची कमतरता भासत नाही.
हळद वनस्पती गुणांनी भरलेली हळदीची वनस्पती केवळ वैद्यकशास्त्राच्याच नव्हे तर शुभतेच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाची मानली जाते. सनातन परंपरेत कोणतेही शुभ कार्य हळदीशिवाय होत नाही. असे मानले जाते की उत्तर किंवा पूर्व दिशेला हळदीचे रोप लावल्याने शुभफळ मिळतात आणि घर धन-धान्याने भरलेले राहते.
बांबू वनस्पती वास्तुशास्त्रानुसार बांबूला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते, जे घरात लावल्यास कुटुंबात सुख-समृद्धी येते. असे मानले जाते की बांबूची वाढ ज्या वेगाने होते, त्याच वेगाने व्यक्तीची प्रगती होते. अशा परिस्थितीत बांबूची लागवड केल्यानंतर ते सुकणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधीत बातम्या
11 march 2022 Panchang | 11 मार्च 2022, शुक्रवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
Zodiac | घराचं घरपण जपतात ‘या’ 4 राशीच्या मुली, सूनेच्या शोधत असाल तर या मुलींचा नक्की विचार करा