महाकुंभात 40 कोटी भाविकांचा अंदाज, मात्र आले 65 कोटी, जास्त लोक कसे आले? फायदा कसा झाला? जाणून घ्या सर्व काही
maha kumbh prayagraj crowd management: महाकुंभामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेमध्ये 3 लाख कोटी रुपयांची भर पडणार आहे. महाकुंभामुळे देशाच्या जीडीपीमध्ये 0.3 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. महाकुंभात अपेक्षा 40 कोटी भाविकांची होती. परंतु महाकुंभाच्या केल्या प्रचारामुळे ही संख्या आता 65 कोटींवर जाणार आहे.

Mahakumbh 2025: जगातील सर्वात मोठा अध्यात्मिक आयोजन असलेला महाकुंभमेळा आता समाप्तीकडे येत आहे. 13 जानेवारी 2025 पासून सुरु झालेला महाकुंभचा समारोप 26 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नासिक या चार पवित्र स्थानावर कुंभमेळा होता. त्यातील प्रयागराजमध्ये 144 वर्षांनी यंदा महाकुंभ आला. आता 2025 नंतर थेट 2169 मध्ये महाकुंभ होणार आहे. आताच्या या महाकुंभातून अनेक विक्रम रचले गेले. धार्मिकपासून अर्थव्यवस्थेपर्यंत अनेक गोष्टींना नवीन आयाम दिला गेला. जगभरातील सनातनीच्या असलेल्या लोकसंख्येपैकी अर्ध्या लोकसंख्येने भक्तीची डुबकी महाकुंभात लगावली. महाकुंभात 40 कोटी भाविक येण्याचा अंदाज होता. परंतु 22 फेब्रुवारीपर्यंत 60 कोटी भाविक आले. महाशिवरात्रीपर्यंत भाविकांची ही संख्या 65 कोटी जाण्याचा अंदाज आहे. महाकुंभात भाविकांची संख्या अंदाजापेक्षा जास्त कशी वाढली? अंदाजापेक्षा जास्त गर्दी होऊन नियोजनात अपवाद वगळता कशी सुसूत्रता राहिली. सुरक्षा व्यवस्था कशी अभेद्य राहिली. जाणून घेऊ हे सर्व काही… ...