Mahakumbh 2025: आधी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेस विरोध, आता महाकुंभाबाबत शंकराचार्यांचा मोठा दावा
mahakumbh 2025: स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, महाकुंभ पोर्णिमेच्या दिवशी संपला. त्यानंतर जे सुरु होते, ते सरकारी महाकुंभ होते. माघ महिन्यात कुंभ असतो. त्यामुळे माघ पोर्णिमेस कुंभ संपला. कुंभात असणारे कल्पवासी माघ महिन्यातील पोर्णिमेस परत गेले

Shankaracharya Swami Avimukteshwaranand: प्रयागराजमध्ये सुरु समापन झालेल्या महाकुंभात 66 कोटी भाविकांनी संगमावर डुबकी लावली. हा जागतिक विक्रम झाला आहे. 45 दिवसांचा महाकुंभमेळा 13 जानेवारी रोजी सुरु झाला. त्याचा समारोप महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारी रोजी झाली. परंतु यासंदर्भात जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी वेगळाच दावा केला आहे. महाकुंभ कधीच संपला होता, त्यानंतर जो राहिला तो सरकारी महाकुंभमेळा होता, असे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटले आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी आयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेसही विरोध केला होता. मंदिर अपूर्ण असल्याचे सांगत प्राणप्रतिष्ठा होऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटले होते.
काय म्हणतात जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद
स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, महाकुंभ पोर्णिमेच्या दिवशी संपला. त्यानंतर जे सुरु होते, ते सरकारी महाकुंभ होते. माघ महिन्यात कुंभ असतो. त्यामुळे माघ पोर्णिमेस कुंभ संपला. कुंभात असणारे कल्पवासी माघ महिन्यातील पोर्णिमेस परत गेले. त्यानंतर जे सुरु होते ते सरकारी आयोजन होते. त्याला अध्यात्मिक महत्व नाही. तो एखादा पारंपरिक मेळा होता, असे शंकराचार्यांनी म्हटले.
गो हत्येसंदर्भात भूमिका स्पष्ट करा
यावेळी जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी 17 मार्च ही गोहत्येविरोधातील आंदोलनाची तारीख जाहीर केली आहे. ते म्हणाले, ‘आम्ही सर्व राजकीय पक्षांना एकत्र येऊन गोहत्या थांबवायची की सुरू ठेवायची हे सांगण्यास सांगितले आहे. कारण स्वातंत्र्यापासून त्यावर चर्चा सुरु आहे. राजकीय पक्षांनी 17 मार्चपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी.




66.30 कोटी भाविकांचे गंगा स्नान
45 दिवस चाललेला महाकुंभाचा समारोप झाला आहे. 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या या महाकुंभात 66.30 कोटी भाविकांनी गंगा आणि संगमात स्नान केले. प्रशासनाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत 1.53 कोटींहून अधिक भाविकांनी गंगा आणि संगमात स्नान केले. भाविकांची ही संख्या चीन आणि भारत वगळता अमेरिका, रशिया आणि युरोपीय देशांसह सर्व देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. तसेच, मक्का आणि व्हॅटिकन सिटीला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येपेक्षा ही संख्या अधिक आहे.