Spiritual: श्रावणात करा महामृत्युंजय मंत्राचा जप, महादेवाच्या कृपेने टळेल गंडांतर

शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि  गंभीर आजारांपासून मुक्ती मिळण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास फायदा होऊ शकतो.  असं मानले जाते की, या मंत्राचा जप केल्याने मृत्यूच्या जवळ जाऊनही विजय मिळवता येतो.

Spiritual: श्रावणात करा महामृत्युंजय मंत्राचा जप, महादेवाच्या कृपेने टळेल गंडांतर
महामृत्युंजय मंत्राचे फायदे Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 5:45 AM

सध्या श्रावण महिना (Shravan Month) सुरु आहे. या महिन्यात भगवान महादेवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. महामृत्युंजय मंत्र (Mahamrutyunjay Mantra Benefits) शंकराचा अतिशय आवडता मंत्र आहे. महामृत्युंजय मंत्राचा जप भगवान शिवाची स्तुती, साधना, जप, तपस्या करण्यासाठी केला जातो. याशिवाय शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि  गंभीर आजारांपासून मुक्ती मिळण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास फायदा होऊ शकतो.  असं मानले जाते की, या मंत्राचा जप केल्याने मृत्यूच्या जवळ जाऊनही विजय मिळवता येतो. यामध्ये विशेषतः शिवाची स्तुती केली जाते. आज जाणून घेऊया या मंत्राचा जप करण्याचे फायदे.

महामृत्युंजय मंत्र

“ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥”

महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याचे फायदे

हे सुद्धा वाचा

आयुष्य वाढवण्यासाठी – पृथ्वीवर आपण अधिक काळ जगावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत अधिक काळ व्यतीत करता यावा यासाठी महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्याने अकाली मृत्यूची भीती दूर होते.

चांगल्या आरोग्यासाठी- निरोगी आरोग्य ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असते. असे मानले जाते की या मंत्राचा जप केल्याने माणसाला गंभीर आजार होत नाहीत. तसेच रोगांचा नाश होतो. नियमित नामजप केल्याने माणूस निरोगी राहतो.

संपत्ती आणि वैभवासाठी – या मंत्राचा जप केल्याने माणसाला केवळ निरोगी शरीरच नाही, तर  ऐश्वर्य, वैभव, सुख आणि सोयी प्राप्त होतात. तसेच भौतिक सुखे प्राप्त होतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर शंकर प्रसन्न होतात, तेव्हा त्या व्यक्तीला माणसाला कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.

संतती प्राप्तीसाठी- संततीप्राप्तीसाठी महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप करावा. असं केल्याने इच्छितांना संतती सुख प्राप्त होते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.