Mahashivratri : उज्जैन नगरीत अशा प्रकारे साजरा झाला दिपोत्सव, काय होते यंदाचे विशेष आकर्षण?

काशी कॉरिडॉरच्या उद्घाटनानंतर 2022 मध्ये पहिल्या महाशिवरात्रीला 5.5 लाख भाविकांनी दर्शन घेतले होते, हा देखील एक विक्रम आहे.

Mahashivratri : उज्जैन नगरीत अशा प्रकारे साजरा झाला दिपोत्सव, काय होते यंदाचे विशेष आकर्षण?
महाशिवरात्रीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 3:19 PM

मुंबई : देशभरात महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2023) उत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शिवमंदिराबाहेर दिवसभर भाविकांची गर्दी होती. हर हर महादेव आणि जय शिवशंकरच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. वाराणसीतील काशी विश्वनाथ धाममध्येही असेच विलक्षण दृश्य पाहायला मिळाले. महाशिवरात्रीला काशी विश्वनाथ मंदिरात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 5 लाख 24 हजार लोकांनी महादेवाचे दर्शन घेतले. ही आकडेवारी ट्रस्टने शेअर केली आहे.

कॉरिडॉरच्या उद्घाटनानंतर भक्तांच्या संख्येत वाढ

ट्रस्टच्या आकडेवारीनुसार, काशी कॉरिडॉरच्या उद्घाटनानंतर 2022 मध्ये पहिल्या महाशिवरात्रीला 5.5 लाख भाविकांनी दर्शन घेतले होते, हा देखील एक विक्रम आहे. यंदाही महाशिवरात्रीला सायंकाळी 6 वाजेपर्यंत 5 लाख 24 हजारांहून अधिक लोकांनी भोलेनाथाचे दर्शन घेतले आहे. श्री काशी विश्वनाथ ट्रस्टचे सीईओ सुनील वर्मा यांनी आशा व्यक्त केली आहे की महाशिवरात्रीच्या अखेरीस 7.5 लाखांहून अधिक भाविक भेट देतील, हा एक नवीन विक्रम असेल.

महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या काशीविश्वनाथ नगरीतच नव्हे, तर बाबा काशीविश्वनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती, तर पहाटेपासूनच सर्व परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रात्र होताच सर्व शिवभक्त मिरवणुकीत सामील झाले. शहरातील विविध भागांतून शिवाच्या मिरवणुका काढण्यात आल्या. महामृत्युंजय मंदिरातून सर्वात आकर्षक शिव मिरवणूक निघाली, ज्याची थीम G20 होती.

हे सुद्धा वाचा

काशीत जंगी मिरवणूक

काशीतील ही सर्वात जुनी शिव पालखी पाचव्या दशकात प्रवेश करत आहे. यावेळी शिववरातीचे 41 वे वर्ष साजरे होत आहे. काशी विश्वनाथ मंदिरातून सोन्याची चोरी झाली तेव्हापासून ही शिव मिरवणूक काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मग काशीच्या लोकांनी मिळून शिव पालखी काढली, जी संपूर्ण जगातली पहिली शिव पालखी होती.

आता परदेशातही शिव पालखी होत आहेत. परप्रांतीयही त्यात सहभागी होण्यासाठी काशीला येतात. प्रत्येक वेळी काशीच्या या प्राचीन शिव मिरवणुकीची वेगळी थीम असते. यावेळी त्याची थीम G-20 आहे, कारण भारत यावेळी G-20 चे अध्यक्ष आहे आणि त्याचे बरेच कार्यक्रम वाराणसीमध्ये आहेत.

उज्जैनमध्ये महाशिवरात्रीचा उत्सव

शिवभक्तीचे असेच एक सुंदर चित्र उज्जैन येथील राम घाटावरही पाहायला मिळाले. महाशिवरात्रीनिमित्त उज्जैनमधील राम घाटावर आयोजित ‘शिव ज्योती अर्पणम 2023’ कार्यक्रमात 18 लाखांहून अधिक मातीचे दिवे प्रज्वलित करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला गेला. यावेळी राम घाटावर लेझर लाईट आणि फायर शोचे दिव्य दर्शन घडले.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.