AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Makar sankrati 2022 | किंक्रांत म्हणजे नक्की काय ? जाणून घ्या रंजक महिती

हिंदू धर्मात (Hindu) मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य देव जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात, त्या दिवसाला मकर संक्रांती किंवा उत्तरायण म्हटलं जातं.

Makar sankrati 2022 | किंक्रांत म्हणजे नक्की काय ? जाणून घ्या रंजक महिती
Makar-Sankranti-2022
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 7:00 AM

मुंबई : हिंदू धर्मात (Hindu) मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य देव जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात, त्या दिवसाला मकर संक्रांती किंवा उत्तरायण म्हटलं जातं. उत्तर भारतातील अनेक भागात मकर संक्रांतीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्याचवेळी दक्षिणेत आसाम आणि पोंगलमध्ये (Pongal) बिहू हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांती दरवर्षी पौष महिन्यात येत असली तरी याची तिथी मात्र निश्चीत नसते. मकर संक्रांती तिथी कधी १४ तारखेला तर कधी १५ तारखेला येत असते. यंदाच्या वर्षीच्या मकर संक्रांतीवर काही विशेष योगायोग घडत आहेत. यावेळी सूर्य आणि शनि एकत्र मकर राशीत असतील. हे संयोजन अत्यंत दुर्मिळ आहे. यापूर्वी १९९३ मध्ये या योग घडला होता. त्यानंतर २९ वर्षांनी हा दुर्मिळ योग पुन्हा घडणार आहे.

हा सण तीन दिवसांचा साजरा करण्यात येतो. या तिन्ही दिवसांचे महत्त्व देखील वेगवेगळे आहेत. संक्रांतीच्या अगोदरचा दिवस हा भोगी म्हणून साजरा करण्यात येतो. हिवाळ्यात येणारा पहिला सण हा भोगी असतो. ऐन थंडीच्या दिवसात येणाऱ्या स्निग्ध आणि उष्ण पदार्थांनी बनलेली भोगीची भाजी केली जाते. सोबतच बाजरीची तीळ घालून भाकरी केली जाते. असा चविष्ठ बेत या दिवशी केला जातो. १४ जानेवारी रोजी संक्रांती साजरी केली जाते. या दिवशी संक्राती या देवीने संकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, अशी मान्यता आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. किंकरआसुर नावाच्या राक्षसाचा वध या दिवशी केला होता, असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधीत बातम्या

Bell in temple | मंदिरात घंटा का असते, जाणून घ्या त्याचे वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व

shakambhari navratri 2022 | आस्था, श्रद्धेचा शाकंभरी नवरात्र उत्सव, कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा जल्लोषात जागर

Makar Sankranti 2022 | कांदा, मुळा भाजी अवघी विठाई माझी, संक्रांतीच्या निमित्त श्री. विठ्ठल मंदिरात फुलं फळे भाजी व पतंगाची आरास

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.